शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आमचा सकारात्मक खेळ करण्याचा प्रयत्न

By admin | Updated: February 1, 2017 04:58 IST

मँ चेस्टर सिटीने आपल्याला घसघश्ीत रक्कम देऊन जर्मनीहून इंग्लंडला का बोलावून घेतले, हे सिद्ध करण्यासाठी लेरॉय सॅने खूप उत्सुक आहे. सॅनेला ३७ मिलियन युरो

- लेरॉय सॅने लिहितो...मँ चेस्टर सिटीने आपल्याला घसघश्ीत रक्कम देऊन जर्मनीहून इंग्लंडला का बोलावून घेतले, हे सिद्ध करण्यासाठी लेरॉय सॅने खूप उत्सुक आहे. सॅनेला ३७ मिलियन युरो इतकी मोठी किंमत देऊन सिटीने आपल्या संघात घेतले. शिवाय, अडखळत्या सुरुवातीनंतर त्याने मोक्याच्या वेळी संघासाठी प्रिमीयर लीगच्या गेल्या दोन लढतींत अनुक्रमे आर्सेनाल व टॉटनहॅमविरुद्ध गोल करून आपली उपयुक्तता सिद्ध केली. सध्या गुणतालिकेत सिटी पाचव्या स्थानी असून, अव्वल स्थानी असलेल्या चेल्सीमध्ये आणि मँचेस्टर सिटीमध्ये १२ गुणांचे अंतर आहे. त्यामुळेच स्पर्धेत आगेकूच करण्यासाठी संघ प्रशिक्षक पेप गॉर्डिओला यांना २१ वर्षीय सॅनेकडून खूप अपेक्षा आहेत. विजयी ३ गुणांव्यतिरिक्त सिटीला काहीही अपेक्षित नाही. त्यामुळेच युवा आणि फॉर्ममध्ये असलेल्या सॅनेवर मँचेस्टर सिटीची सध्या मुख्य मदार असेल.जर्मनीहून इंग्लंडला आल्यापासून तू मोक्याच्या वेळी लक्षवेधी ठरलास. सध्या सर्व काही तुला अनुकूल ठरत असल्याचे वाटते का?सध्या माझी कामगिरी चांगली होत आहे. मँचेस्टरला माझ्या घरचे वातावरण अनुभवत आहे. शिवाय, पुढील काही आठवडे आणि महिने माझ्यासाठी नव्या संधी घेऊन येणारे ठरणार आहेत. नव्या क्लबमध्ये सुरुवातीलाच दुखापतग्रस्त होणे चांगली बाब नाही. मला हॅमस्ट्रिंगची अडचण होती आणि त्यातून सावरण्यासाठी काही वेळ हवा होता; पण त्यानंतर झोकात पुनरागमन करताना मी संघासाठी गोल करण्यात यशस्वी ठरलो. यंदाचे मोसम सिटीसाठी चढ-उताराचे ठरले. गेल्या आठवड्यात टॉटनहॅमविरुद्ध २-० अशा आघाडीवर असताना २-२ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. काय सांगशील?खरं म्हणजे तो कठीण सामना ठरला. आम्ही विजयाचे हक्कदार होतो. सामना पूर्णपणे आमच्या बाजूने होता; परंतु अखेर आम्ही सामना जिंकण्यात अपयशी ठरलो. आगामी वेस्ट हॅमविरुद्धच्या लढतीत ही सर्व भरपाई भरून काढणार का?आम्ही केवळ सकारात्मकपणे खेळण्याचा प्रयत्न करणार आहोत. टॉटनहॅमविरुद्धच्या निकालाने नक्कीच आम्ही निराश आहोत. आम्ही नियंत्रण राखताना पहिल्या सत्रात व त्यानंतरही वर्चस्व ठेवले होते. त्यामुळेच जास्त दु:ख आहे. पण, आम्ही चांगला खेळ केला आणि सामन्यागणिक तो उंचावण्याचा प्रयत्न राहील. माझ्याबाबत सांगायचे झाल्यास, मी गेल्या दोन सामन्यांत गोल केले असून तेच सातत्य कायम राखण्याचा प्रयत्न राहील.तू सांगितल्याप्रमाणे या क्लबमध्ये तू खूष आहेस. सहा महिन्यांनंतर इंग्लंडमध्ये रुळला आहेस का?कदाचित हो. मँचेस्टर मला माझ्या घरासारखंच वाटत आहे. शिवाय, माझ्या संघहकाऱ्यांनी खूप चांगल्या प्रकारे स्वागत केले आहे. मी क्लबमध्ये जागा मिळविण्याचा प्रयत्न करीत असून, ते मी मिळविले आहे. संघातील शानदार खेळाडूंसह खेळताना क्लबला विजयी करण्यासाठी आम्ही संघभावनेने खेळतो. मला माझ्या क्षमतेवर विश्वास आहे. सुपरस्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या सिटी संघात स्वत:ची ओळख निर्माण करणे नक्कीच सोपे गेले नसेल?नक्कीच. कारण, संघातील प्रत्येक जागेवर सर्वोत्तम खेळाडू सज्ज आहे. याचा अर्थ, संघात स्थान मिळविण्यासाठी तुम्हाला सरावातही चमक दाखविणे अनिवार्य ठरते. यासाठी तुम्हाला आत्मविश्वास दाखवावा लागतो. त्या जोरावरच स्वत:ची उपयुक्तता सिद्ध करू शकता.मॅनेजर पेप गॉर्डिओला यांच्याविषयी काय सांगशील?गॉर्डिओला यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणे म्हणजे शिक्षणासारखे आहे. ते सर्व बघत असतात आणि जेव्हा त्यांना काही चुका निदर्शनास येतात, तेव्हा गॉर्डिओला स्पष्टपणे तसे सांगतात. ते खेळाडूंना त्यांच्या चुका सुधारण्यास मदत करतात. खेळाडूंसाठी ते कायम तयार असतात.गॉर्डिओला यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडू म्हणून तुझी प्रगती झाली का?हो. इतकंच काय कमी वेळेमध्ये इंग्लंडमध्ये गॉर्डिओला यांच्या मार्गदर्शनाखाली मी खूप काही शिकलो. माझ्या मते, खेळाडू म्हणून त्यांनी माझ्यात खूप प्रगती केली आहे. स्ट्रायकरसह मी अनेक पोझिशनवर त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळलो आहे आणि त्यातून अनेक जबाबदाऱ्यांची जाणीव झाली. सिटीची पुढील वाटचाल कशी असेल? मोठे यश मिळविण्यात यश येईल का?नक्कीच. मला विश्वास आहे. हा असा क्लब आहे, जो आपले लक्ष्य साधतो. या क्लबचा सदस्य असल्याचा आनंद आहे. संघात जोश जबरदस्त आहे. संघासाठी प्रिमीयर लीग, चॅम्पियन लीगचे जेतेपद जिकून देण्यासाठी खेळाडू उत्सुक आहेत. आम्ही आता केवळ प्रत्येक सामना जिंकून चेल्सीला गाठण्याचा प्रयत्न करू. काही चांगल्या संघांविरुद्ध आम्ही बाजी मारली; परंतु त्याहून अधिक चांगल्या कामगिरीची आवश्यकता असल्याची जाणीवही आम्हाला आहे.(पीएमजी)