हैदराबाद : आयपीएलमध्ये आल्यापासून संघर्ष करीत असलेल्या सनराइजर्स हैदराबादला नवव्या सत्रातही सुरुवातीला पराभवाचे तोंड पहावे लागले. पण कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आज शनिवारी नशीब पालटण्याची चांगली संधी या संघाकडे राहील. सनराइजर्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला पहिला सामना ४५ धावांनी गमविला. केकेआरचे दोन सामने झाले. पहिल्या सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सला नऊ गड्यांनी धूळ चारणारा हा संघ दुसऱ्या सामन्यात मात्र मुंबईकडून सहा गड्यांनी पराभूत झाला. हैदराबाद संघ दुसऱ्या सामन्यात डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वात घरच्या मैदानावर विजय नोंदवू शकतो. असे झाल्यास केकेआर संघात पराभवानंतर नकारात्मक वृत्तीचा संचार होण्याचा धोका आहे. २०१३ मध्ये आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या हैदराबाद संघाला आतापर्यंत विजयी समन्वय साधता आलेला नाही. कर्णधारपदही अनेक व्यक्तींकडे गेले. कुमार संगकारा, कॅमेरुन व्हाईट, शिखर धवन, डेरेन सॅमी आणि आता डेव्हिड वॉर्नर असे दिग्गज आले पण सक्षम नेतृत्व करीत कुणीही संघाला संकटमुक्त करू शकले नाहीत. कोलकाता संघाला स्वत:च्या नेतृत्वात दोनदा चॅम्पियन बनविणाऱ्या गौतम गंभीरच्या संघाला मुंबईकडून स्वीकारावा लागणारा पराभव धक्कादायक होता. संघाला विजयी पथावर आणण्याचे अवघड आव्हान त्याच्यापुढे आहे. १८७ धावा काढूनही गोलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे सामना गमवावा लागला. आता सुनील नारायणच्या बळावर हैदराबादला नमविण्याची गंभीरला आशा असेल. ब्रॅड हॉग आणि आंद्रे रसेल यांनी मुंबईच्या फलंदाजांना स्वैर मारा करीत भरपूर धावा मोजल्या. हैदराबाद संघात धवन, वॉर्नर, उथप्पा आणि युवराजसारखे फलंदाज आहेत. अशावेळी कोलकाताच्या गोलंदाजांना पुन्हा एकदा परीक्षा द्यावी लागेल. केकेआरविरुद्ध युवराज मैदानात उतरतो का, हे पाहणे रंजक ठरेल. धवन सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. त्याला धावा काढून संघाच्या विजयात योगदान द्यावेच लागेल. गोलंदाजीत आशिष नेहरा, भुवनेश्वर कुमार, मुस्तफिजूर रहमान, कर्ण शर्मा यांचा मारा सरस वाटतो. पण प्रत्येक क्षेत्रात शिस्तबद्ध कामगिरी झाली तरच हैदराबादचा विजय साकार होऊ शकेल. (वृत्तसंस्था)उभय संघ यातून निवडणारकोलकाता नाइट रायडर्स : गौतम गंभीर (कर्णधार), सुनील नारायण, रॉबिन उथप्पा, पीयूष चावला, युसूफ पठाण, शकीब अल् हसन, मॉर्ने मॉर्केल, उमेश यादव, मनीष पांडे, जयदेव उनाडकट, जॉन हेस्टिंग्ज, ख्रिस लिन, सूर्यकुमार यादव, आंद्रे रसेल, ब्रॅड हॉग, कुलदीप यादव, कॉलिन मन्रो, शेल्डन जॅक्सन, जॉन हेस्टिंग्ज, जेसन होल्डर, ब्रॅड हॉग, मनन शर्मा, राजगोपाल सतीश व सूर्यकुमार यादव.सनरायझर्स हैदराबाद : शिखर धवन (कर्णधार), युवराजसिंग, आशिष नेहरा, डेव्हिड वॉर्नर, भुवनेश्वरकुमार, ट्रेंट बोल्ट, कर्ण शर्मा, इआॅन मॉर्गन, मुस्तफिझूर रहमान, आदित्य तरे, बरिंदर सरन, के. एल. राहुल, मोझेस हेन्रिक्स, परवेझ रसूल, केन विल्यमसन, नमन ओझा, अभिमन्यू मिथुन, आशिष रेड्डी, विपुल शर्मा, सिद्धार्थ कौल, रिकी भुई, बेन कटिंग, विनय शंकर, आशिष नेहरा व टी. सुमन.
हैदराबादला नशीब पालटण्याची संधी
By admin | Updated: April 16, 2016 03:30 IST