सोलापूर: जम्परोप असोसिएशन ऑफ जम्मू आणि काश्मीरच्या वतीने जम्मू येथे आयोजित 12 व्या सबज्युनियर राष्ट्रीय जम्परोप स्पर्धेत इंडियन मॉडेल स्कूलमधील सातवी इयत्तेतील ओंकार सुरेश वाघमोडे याने दोन सुवर्णपदक पटकावले आह़ेत्याने डबल टच स्पिड रिले व डबल टच स्पिड पेअर रिले गटात प्रत्येकी एक असे दोन सुवर्ण जिंकल़े त्याला क्रीडाशिक्षक संदेश पवार, सचिन ढवान, राजेंद्र माने यांचे मार्गदर्शन लाभल़े त्याचे आयएमएसचे संस्थापक प्रा़ए़डी़जोशी, अमोल जोशी, सायली जोशी, मुख्याध्यापिका अपर्णा कुलकर्णी, अचला राचर्ला, ममता बसवंती, अशोक वाघमोडे, सुरेश वाघमोडे, गीता वाघमोडे यांनी कौतुक केल़े (क्रीडा प्रतिनिधी)
ओंकार वाघमोडेला दोन सुवर्ण
By admin | Updated: October 19, 2015 00:13 IST