शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
3
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
4
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
5
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
6
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
7
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
8
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
9
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
10
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
11
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
12
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
13
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
14
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
15
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
16
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
17
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
18
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
19
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
20
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या

ओएनजीसीने विजेतेपद राखले

By admin | Updated: January 20, 2015 00:17 IST

आपल्या लौकिकानुसार आक्रमक खेळ करताना १०व्या सॅव्हीओ चषक आॅल इंडिया बासेक्टबॉल स्पर्धेत पुरुष गटाचे विजेतेपद राखताना सलग दुसऱ्या वर्षी बाजी मारली.

मुंबई : गतविजेत्या बलाढ्य ओएनजीसी संघाने आपल्या लौकिकानुसार आक्रमक खेळ करताना १०व्या सॅव्हीओ चषक आॅल इंडिया बासेक्टबॉल स्पर्धेत पुरुष गटाचे विजेतेपद राखताना सलग दुसऱ्या वर्षी बाजी मारली. अंतिम सामन्यात इंडियन ओवरसीज बँक (आयओबी) संघाचे आव्हान ६३-५३ असे परतावून लावताना ओएनजीसीने आपले वर्चस्व सिद्ध केले.डॉन बॉस्को शाळेच्या बास्केटबॉल कोर्टवर पार पडलेल्या या अंतिम सामन्यात ओएनजीसीने सावध सुरुवात करताना बचावात्मक पवित्रा घेतला. पहिल्या उपांत्य सामन्यात ओएनजीसीने आयओबीला नमवले होते. तरीदेखील ओएनजीसीने कुठेही ढिलाई न ठेवताना विजेतेपदाला गवसणी घातली. पहिल्या क्वार्टरमध्येच १९-५ अशी मोठी आघाडी घेत आपला इरादा स्पष्ट करणाऱ्या ओएनजीसीने मध्यांतराला ३१-१६ अशी एकतर्फी आघाडी घेत सामन्यावर नियंत्रण राखले.मध्यांतरानंतरच्या खेळामध्ये आयओबीने झुंजार खेळ करीत पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. तिसऱ्या व चौथ्या क्वार्टरमध्ये बँकेने ओएनजीसीच्या तुलनेत चांगला खेळ करीत सामना चुरशीचा केला. मात्र पहिल्या सत्रातील मोठी आघाडी निर्णायक ठरवत ओएनजीसीने सहजपणे विजेतेपद निश्चित केले. ओएनजीसीकडून विशेष भृगवंशी याने सर्वाधिक १७ गुण नोंदवताना निर्णायक खेळ केला. अनुप एम. यानेदेखील १० गुण मिळवताना विशेषला चांगली साथ दिली. त्याचवेळी दुसऱ्या सत्रात प्रसन्ना वेंकटेश (११), अमरज्योत (१०) आणि मिहिर पांड्ये (१०) या त्रिकूटाने झुंजार खेळ करताना आयओबीचा पराभव लांबवण्याचा अपयशी प्रयत्न केला.तत्पूर्वी झालेल्या महिलांच्या अंतिम सामन्यात राष्ट्रीय विजेत्या छत्तीसगडने चमकदार खेळ करताना पाच वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या बलाढ्य दक्षिण रेल्वेला ७१-६३ असे नमवून आपला हिसका दाखवला. तत्पूर्वी महिला गटात पूनम चतुर्वेदीने केलेल्या निर्णायक खेळाच्या जोरावर छत्तीसगड संघाने गतविजेत्या बलाढ्य दक्षिण रेल्वेला ७१-६३ असा धक्का शानदार विजेतेपद पटकावले. रेल्वेने पहिल्या दोन क्वार्टरमध्ये जोरदार धडक मारताना मध्यांतराला ३३-२९ अशी आघाडी घेत सामन्यावर नियंत्रण राखले. मध्यांतरानंतर मात्र छत्तीसगडने आपला हिसका दाखवण्यास सुरुवात केली. पूनमने वेगवान चाली करीत प्रतिस्पर्धी खेळाडूंना आपल्या जवळपासदेखील फिरकू दिले नाही. छत्तीसगडने एकहाती वर्चस्व राखताना अखेर गतविजेत्या दक्षिण रेल्वेला ७१-६३ असे नमवले. (क्रीडा प्रतिनिधी) वैयक्तिक विजेते स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू :पुरुष : रियाझुद्दिन (ओएनजीसी)महिला : सरनजीत कौर (छत्तीसगड)लक्षवेधी खेळाडू : पूनम चतुर्वेदी (छत्तीसगड)अंतिम सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू :पुरुष : विशेष भृगवंशी (ओएनजीसी)महिला पूनम चतुर्वेदी (छत्तीसगड)