शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

प्रतिभावान मल्लास दत्तक घेतल्यास ऑलिम्पिक पदक दूर नाही : काका पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 16:22 IST

आता आपल्याकडे आंतरराष्ट्रीय पहिलवानांची फळी मोठी आहे. या सर्वांचे भविष्य उज्वल आहे

जालना : राजकीय नेते आणि मोठ्या कंपन्यांनी पुढाकार घेऊन एकेक पहिलवान दत्तक घेतला तर महाराष्ट्राला देशासाठी आॅलिम्पिक मेडल जिंकून देणे कठीण नाही, असे मत व्यक्त केले आहे ते अर्जुनपुरस्कारप्राप्त काका पवार यांनी.जालना येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी काका पवार आले आहेत. 

काका पवार हे १९९९ साली अर्जुन पुरस्काराने सन्मानित असून त्यांना खेळाडू म्हणून १९८८ आणि प्रशिक्षक म्हणून २0१६ साली शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. जालना येथील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या नियोजनाचीही काका पवार यांनी प्रशंसा केली. या वेळी त्यांनी लोकमतशी विशेष संवाद साधला. 

प्रतिभावान मल्लांना दत्तक घ्यावे काका पवार म्हणाले, ‘‘राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांचे महाराष्ट्राच्या मल्लाने आॅलिम्पिकमध्ये मेडल जिंकावे हे स्वप्न आहे. त्यामुळे यांनी राहुल आवारे, उत्कर्ष काळे, किरण भगत, अभिजीत कटके यांना दत्तक घेतले असून त्यांना प्रति महिना एक लाख रुपये खुराक व प्रशिक्षणासाठी दिले आहेत. त्यांच्याप्रमाणेच मोठे राजकीय नेते, मोठ्या कंपन्या आणि दानशूर व्यक्तींनी महाराष्ट्रातील प्रतिभवान असणारे एकेक मल्ल दत्तक घ्यायला हवा. असे झाल्यास महाराष्ट्रातील पहिलवानाला आॅलिम्पिकमध्ये मेडल जिंकण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. शरद पवार यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आता मल्लांवर आहे.’’

मराठवाड्यात कुस्ती केंद्र सुरु करणार ‘‘प्रतिष्ठित अशी महाराष्ट्र केसरी कुस्ती आयोजन करु शकतो हे मराठवाड्याने दाखवून दिले. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचेही नियोजनही चांगल्या पद्धतीने होत आहे.’’ पुणे येथे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाद्वारे २५ पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय पहिलवान घडवणाऱ्या काका पवार यांनी मराठवाड्यातील मल्लांसाठी कुस्ती केंद्र सुरु करण्यास पुढाकार घेण्यास तयार असल्याचे सांगताना लातूर येथे कुस्ती केंद्रासाठी शासनाकडे एक एकर जागा मागितली असल्याची माहितीही दिली. 

आपल्याकडे आंतरराष्ट्रीय पहिलवानांची फळी गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदकप्राप्त राहुल आवारे आतापर्यंत आॅलिम्पिक खेळू शकला असता; परंतु २0१२ आणि २0१६ मध्ये गुणवत्ता असूनही त्याच्यावर अन्याय झाला. त्यावेळी कुस्ती संघटकांच्या पाठिंबा नसल्यामुळे तो आॅलिम्पिक खेळू शकला नाही. २0१२ मध्ये राहुल ज्या गटात खेळतो त्या गटात जाणीवपूर्वक १00 पेक्षा जास्त पहिलवान ट्रायल्समध्ये खेळवले गेले तसेच २0१६ मध्ये ट्रायल न घेता भारतीय संघ पाठवल्याने राहुलवर मोठा अन्याय त्या वेळेस झाला आहे. राहुल आवारे आणि उत्कर्ष काळे हे आॅलिम्पिकमध्ये देशाला मेडल्स जिंकून देतील असा विश्वास आहे. या दोघांशिवायही आता आपल्याकडे आंतरराष्ट्रीय पहिलवानांची फळी मोठी आहे. या सर्वांचे भविष्य उज्वल असल्याचेही काका पवार यांनी सांगितले.

टॅग्स :Wrestlingकुस्तीMaharashtra Kesariमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा