शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

मनू भाकरने मिळवले ऑलिम्पिक तिकिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 04:18 IST

युवा नेमबाज मनू भाकरने बुधवारी येथे आयएसएसएफ विश्वचषकमध्ये महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत चौथ्या स्थानावर राहताना भारतासाठी नेमबाजीमध्ये सातवा ऑलिम्पिक कोटा मिळवला.

म्युनिच : युवा नेमबाज मनू भाकरने बुधवारी येथे आयएसएसएफ विश्वचषकमध्ये महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत चौथ्या स्थानावर राहताना भारतासाठी नेमबाजीमध्ये सातवा ऑलिम्पिक कोटा मिळवला. १७ वर्षीय मनूने फायनलमध्ये २०१.० अंकांसह आॅलिम्पिक कोटा पटकावला.अव्वल विश्व स्पर्धामध्ये अनेक पदके जिंकणारी मनू पात्रता फेरीत ५८२ अंकासह तिसऱ्या स्थानी होती. तिने अंतिम दोन फेऱ्यांमध्ये ९८ गुणांची कमाई केली. सोमवारी मनूच्या पदरी निराशा आली. आघाडीच्या स्थानावर असताना तिची बंदूक खराब झाली आणि तिला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. महिलांच्या १० मीटर पिस्तूल स्पर्धेत भारताचा हा पहिला कोटा आहे.सौरव चौधरी व अभिषेक वर्मा यांनी अनुक्रमे दिल्ली व बीजिंगमध्ये विश्वकप स्पर्धेत पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तुल स्पर्धेत आॅलिम्पिक कोटा मिळवला होता. ज्युनिअर विश्वकप चॅम्पियन यशस्वीनी सिंग देसवाल ही देखील अंतिम फेरीत स्थान मिळवण्याच्या दिशेने वाटचाल करीत होती, पण अंतिम सेटमध्ये ९२ गुणांसह ५७४ अंकांसह ती २२ व्या स्थानी घसरली. स्पर्धेत सहभागी झालेली तिसरी भारतीय हीना सिद्धू ५७० अंकांसह ४५ व्या स्थानी राहिली. (वृत्तसंस्था)