शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

'पिस्तूल क्वीन' राही सरनोबत उपजिल्हाधिकारी झाली; पण ८ वर्षांपासून तिचा पगारच काढला नाही; कारण न पटण्याजोगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 13:44 IST

प्रशासनाचा गजब कारभार; या कारणास्तव काढला नाही पगार

कोल्हापूरची शान अन् देशाचा अभिमान असणारी आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू राही सरनोबत हिने २५ मीटर पिस्तूल प्रकारात  भारताचे प्रतिनिधीत्व करताना आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत अनेक पदकं जिंकून विशेष छाप सोडली आहे. अचूक लक्ष भेदून आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्षेधी कामगिरी केल्याबद्दल राही सरनोबत हिला २०१४ मध्ये उपजिल्हाधिकारी पदावर नियुक्त करण्यात आली. सरकारी नोकरी मिळाली, पण मागील ८ वर्षांपासून तिचा पगारच काढलेला नाही. हा मुद्दा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

प्रशासनाचा गजब कारभार; या कारणास्तव काढला नाही पगार

उपजिल्हाधिकारी पदावर नियुक्ती झाल्यावर राही सरनोबत हिला पहिले तीन वर्षे पगार मिळाला. पण त्यानंतर ८ वर्षे राही सरनोबतचा पगार थकीत आहे. प्रशिक्षणार्थी कालावधी पूर्ण न केल्यामुळे पगार काढण्यात आलेला नाही, असे स्पष्टीकरण प्रशासनाकडून देण्यात आले आहे. राही सरनोबत सातत्याने भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करत असल्यामुळे तिला सरकारी नोकरीतील आवश्यक प्रशिक्षणार्थी कालवाधी पूर्ण करता आलेला नाही. त्यामुळे  प्रशासनानं दिलेले कारण हे न पडण्याजोगेच आहे. यासंदर्भात राहीसह तिच्या कुटुंबियांनी  वारंवार प्रशासनाकडे दाद मागितली,  पण म्हणावा तसा प्रतिसाद काही मिळाला नाही. 

विधानसभेत मांडला मुद्दा, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडूनही सकारात्मक प्रतिसाद

जागतिकस्तरावर देशाचं नाव उंचावणाऱ्या खेळाडूच्या वेतन थकीत असल्याचा मुद्दा आमदार अमित गोखले यांनी सोमवारी विधान परिषदेत मांडला आहे.  मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागाला पगार काढण्यासोबत सेवेत नियमित करण्याचे आदेश देण्याचे आश्वासन दिले आहे. या मुद्यावर खुद्द राही सरनोबत हिने दोन महिन्यांपूर्वी उप मुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. पहिल्यांदाच या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित दादांशी चर्चा केली, त्यांनी यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला असून आता हा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास राहीनं एका मुलाखतीमध्ये व्यक्त केला.

टॅग्स :Rahi Sarnobatराही सरनोबत