शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ऑलिम्पिकची संधी मिळाल्यास अवश्य भाग घेईन - विजेंदर सिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 23:25 IST

माजी डब्ल्यूबीओ आशिया पॅसिफिक चॅम्पियन विजेंदरने नेवार्क येथे अमेरिकन व्यावसायिक सर्किटमधील पदार्पणात आपल्याहून अधिक अनुभवी असलेल्या माईक स्नायडरचा तांत्रिक नॉकआऊटने पराभव केला.

नवी दिल्ली: स्टार बॉक्सर विजेंदरसिंग याची व्यावसायिक सर्किटमधील वाटचाल यशस्वी ठरली असून दीड वर्षानंतर रिंगणात आलेल्या विजेंदरने सलग ११ वी लढत जिंकली. या यशामुळे ऑलिम्पिककडे वळण्याचा सध्यातरी त्याचा विचार नाही. तथापि, ‘मिडलवेटमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्यास अवश्य विचार करेन,’ असे तो म्हणाला.माजी डब्ल्यूबीओ आशिया पॅसिफिक चॅम्पियन विजेंदरने नेवार्क येथे अमेरिकन व्यावसायिक सर्किटमधील पदार्पणात आपल्याहून अधिक अनुभवी असलेल्या माईक स्नायडरचा तांत्रिक नॉकआऊटने पराभव केला. विजेंदरचा हा आठवा नॉकआऊट विजय होता.चित्रपट, राजकारण आणि टीव्ही शोचा अँकर या गोष्टींमध्ये हात आजमावणाऱ्या विजेंदरने आपण कुठल्याही क्षेत्रात गेलो तरी बॉक्सिंग कधीही सुटणार नाही, असे स्पष्ट केले. ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याबाबत तो म्हणाला, ‘माझ्या प्रायोजकांसोबतच्या दोन लढती अद्याप शिल्लक आहेत. माझे लक्ष सध्यातरी या लढतींवर केंद्रित आहे. ऑलिम्पिकदरम्यान परिस्थिती कशी असेल याबाबत आताच काही सांगू शकत नाही. पण पुन्हा संधी मिळाली तर ऑलिम्पिकमध्ये नक्की जाईन.’‘अमेरिकेतील पदार्पणात प्रतिस्पर्धी स्रायडरबाबत मला अधिक माहिती नव्हती. स्रायडरने पहिला ठोसा हाणला तेव्हा मी अवाक् झालो. ताबडतोब सावरून पुढील चार फेऱ्यांमध्ये त्याला नॉकआऊट केले,’ असेही विजेंदरने सांगितले.

टॅग्स :Vijender Singhविजेंदर सिंगboxingबॉक्सिंग