शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

आता लक्ष्य ९० मीटरचे- नीरज चोप्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 05:50 IST

भविष्यातील स्पर्धांसाठी सज्ज राहायचे आहे

टोकियो : ऑलिम्पिकमध्ये भारताला अ‍ॅथलेटिक्समधील पहिलेवहिले सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राने आपल्या नव्या लक्ष्याच्या तयारीला सुरुवात केली आहे. ‘ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकल्यानंतर, आता माझे लक्ष्य ९० मीटरची फेक करण्याचे आहे,’ असे सांगत नीरजने आपले पुढील लक्ष्य सांगितले. अंतिम फेरीत सुवर्णपदक जवळपास निश्चित झाल्यानंतरही नीरजने ९०.५७ मीटरची विक्रमी कामगिरी मागे टाकण्याचा प्रयत्न केला; पण यामध्ये त्याला यश आले नाही.आपल्या ऐतिहासिक कामगिरीनंतर नीरजने सांगितले की, ‘भालाफेक खेळामध्ये तंत्र अत्यंत महत्त्वाचे असते. अनेक दिवसांच्या कामगिरीवर आणि फॉर्मवर सर्वकाही अवलंबून असते. त्यामुळे आता माझे पुढील लक्ष्य ९० मीटर अंतर पार करण्याचे आहे. यंदाच्या वर्षी मी केवळ ऑलिम्पिकवर लक्ष्य केंद्रित केले होते. आता मी सुवर्ण जिंकले असल्याने, आता पुढील स्पर्धांसाठी मी योजना बनवीन. भारतात परतल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी व्हिसा मिळविण्याचा मी प्रयत्न करीन.’ नीरजने १३ जुलैला गेटशीट डायमंड लीगमधून माघार घेतली होती. ऑलिम्पिकनंतर या सिरीजमधील बाकीच्या सत्रांमध्ये सहभागी होणार असल्याचे नीरजने म्हटले होते. लुसाने (२६ ऑगस्ट), पॅरिस (२८ ऑगस्ट) येथे होणाऱ्या या स्पर्धांसह ज्युरिख (९ सप्टेंबर) येथील स्पर्धांच्या अंतिम फेरीतही भालाफेकचा समावेश आहे.माझ्यावर कोणत्याही प्रकारचे दडपण नव्हते आणि ऑलिम्पिकमध्ये मी अन्य स्पर्धांप्रमाणेच सहभागी झालो होतो. यामुळे मला माझ्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करता आले. मला सुवर्ण जिंकण्यास याचा फायदा झाला. - नीरज चोप्रा 

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021Neeraj Chopraनीरज चोप्रा