शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

ऑलिम्पिक आयोजनासाठी ठोस तोडगा नाहीच, कोरोना संक्रमण ठरतोय मोठा अडथळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 04:49 IST

कोरोनाचा जगभर प्रकोप वाढल्यानंतरही २४ जुलै ते ९ ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिकचे आयोजन झाले, तर आम्हाला आरोग्याविषयी मोठी जोखीम पत्करावी लागेल

लुसाने : ‘यंदा टोकिओ ऑलिम्पिकचे आयोजन करण्यासाठी कोरोनाचा प्रकोप मोठा अडथळा ठरत आहे,’ अशी जाहीर कबुली आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने दिली. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी असाधारण तोडगा काढण्याची गरज असल्याचे आयओसी प्रवक्त्याने म्हटले. ते म्हणाले, ‘कोरोनावर मात करण्यासाठी असाधारण समाधान शोधवे लागेल.’कोरोनाचा जगभर प्रकोप वाढल्यानंतरही २४ जुलै ते ९ ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिकचे आयोजन झाले, तर आम्हाला आरोग्याविषयी मोठी जोखीम पत्करावी लागेल, अशी बोचरी टीकाही अनेक दिग्गज खेळाडूंनी आयओसीवर केली होती. यानंतर बुधवारी आयओसीने प्रथमच टोकियो ऑलिम्पिक आयोजनासाठी आदर्श तोडगा निघाला नसल्याचे कबूल केले.प्रवक्ता पुढे म्हणाला, ‘ऑलिम्पिक आयोजनाची अखंडता आणि खेळाडूंचे आरोग्य लक्षात घेता आयोजनासाठी आदर्श तोडगा शोधणे गरजेचे आहे. यामुळे खेळाडूंवर नकारात्मक प्रभाव पडणार नाही, याचीही खबरदारी घ्यावी लागेल. खेळाडूंच्या आरोग्यास सर्वोच्च प्राधान्य असेल. आदर्श समाधान निघाल्यानंतरच टोकियो आॅलिम्पिकच्या आयोजनाचा निर्णय घेता येऊ शकेल.’बांबू उडीतील ऑलिम्पिक चॅम्पियन कॅटरिना स्टेफेनिडी व ब्रिटिश हेप्टथलानपटू कॅटरिना जॉन्सन यांनी २४ जुलैपासून आॅलिम्पिक होत असेल, खेळाडूंच्या आरोग्याचे काय? असा प्रश्न उपस्थित केला होता. (वृत्तसंस्था)टोकियो ऑलिम्पिक जिम्नॅस्टिक टेस्ट रद्दटोकियो ऑलिम्पिकच्या आयोजकांनी बुधवारी सांगितले की, ‘चार आणि पाच एप्रिल रोजी होणारी जिम्नॅस्टिक चाचणी स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. जापान जिम्नॅस्टिक संघाने लयबद्ध जिम्नॅस्टिक ऑल अराऊंड विश्वचषक रद्द केला आहे.’कोरोना व्हायरस महामारीनंतरही आयओसीने स्पष्ट केले आहे की, ‘ऑलिम्पिक निर्धारीत २४ जुलै रोजीच होईल.’ त्याचवेळी, एका स्थानिक सर्व्हेनुसार ७० टक्के जापानी लोकांना वाटते की, ऑलिम्पिक निर्धारीत वेळेनुसार होणार नाही. दरम्यान ऑलिम्पिक मशाल येथे शुक्रवारी ग्रीसहून विमानाने पोहचेल. चार महिने रंगणाऱ्या मशाल रिलेला २६ मार्च पासून सुरूवात होईल.

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2020