शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

Paris Olympics 2024: नीता अंबानी यांची IOC सदस्यपदी एकमताने निवड; मिळाली १०० टक्के मतं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 20:49 IST

IOC Member: नीता अंबानी या २०१६ नंतर पुन्हा एकदा बनल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती सदस्य

Nita Ambani IOC Member: फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे २६ जुलैपासून ऑलिम्पिक स्पर्धा सुरु होणार आहे. या स्पर्धेत भारताकडून अनेक खेळाडू पाठवण्यात आले आहेत. या खेळाडूंनी भारतासाठी जास्तीत जास्त पदके जिंकावीत, अशी सर्व भारतीयांची अपेक्षा आहे. मात्र ऑलिम्पिक स्पर्धा सुरु होण्याआधीच भारतीयांना खुशखबर मिळाली आहे. Mumbai Indians च्या मालकीण आणि रिलायन्स फाऊंडेशच्या संस्थापिका नीता अंबानी यांना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (IOC) सदस्यपद मिळाले आहे. पॅरिसमधील १४२ व्या IOC अधिवेशनात नीता अंबानी यांची भारतातून IOC सदस्य म्हणून एकमताने पुन्हा निवड करण्यात आली. हे IOC अधिवेशन सध्या सुरु असून नीता अंबानी या सदस्य म्हणून १००% मतांनी एकमताने विजयी झाल्या. यापूर्वी २०१६ मध्ये त्यांना हा बहुमान मिळाला होता.

पुन्हा निवडून आल्यावर बोलताना नीता अंबानी म्हणाल्या, "आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचा सदस्य म्हणून पुन्हा निवड झाल्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो. माझ्यावर विश्वास दाखवल्याबाबत मी समितीचे अध्यक्ष आणि IOC मधील माझ्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानू इच्छिते. ही फेरनिवडणूक हा केवळ वैयक्तिक मैलाचा दगड नसून जागतिक क्रीडा क्षेत्रात भारताच्या वाढत्या प्रभावाची ओळख आहे. मी हा आनंद आणि अभिमानाचा क्षण प्रत्येक भारतीयासोबत शेअर करते. भारत आणि जगभरातील ऑलिम्पिक चळवळीला बळकटी देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू ठेवण्यास मी उत्सुक आहे."

नीता अंबानी यांची २०१६ मध्ये रिओ दि जानेरो ऑलिम्पिक गेम्समध्ये प्रतिष्ठित संस्थेत सामील होण्यासाठी पहिल्यांदा नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हा IOC मध्ये सामील होणाऱ्या त्या भारताची पहिली महिला होत्या. नीता अंबानी यांनी संघटनेच्या उन्नतीसाठी खूप प्रयत्न केले. तसेच भारतातील क्रीडापटूंना व्यासपीठ मिळवून देण्याच्या दृष्टीनेही चांगले कार्य केले.

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४nita ambaniनीता अंबानीFranceफ्रान्सIndiaभारत