शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Nisha Dahiya, India in Paris Olympics 2024: दुर्दैवी पराभव! ८-१ने पुढे होती, खांद्याला दुखापत झाली अन् भारताची निशा दहिया हरली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 11:41 IST

Nisha Dahiya Wrestling, India in Paris Olympics 2024: दुखापतीमुळे पराभूत झाल्यानंतर अक्षरश: ढसाढसा रडली निशा दहिया

Nisha Dahiya Wrestling, India in Paris Olympics 2024: भारतीयकुस्तीपटू निशा दहिया महिलांच्या ६८ किलो फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाली. तिला उत्तर कोरियाच्या सोल गुमने १०-८ अशा फरकाने पराभूत केले. निशाने उत्तर कोरियाच्या कुस्तीपटू विरुद्ध दमदार सुरुवात केली होती. ती सहज विजयाच्या दिशेने वाटचाल करत होती. पण उत्तारार्धात तिला दुखापत झाली. दुखावलेल्या हाताने आणि खांद्याने निशा वेदना होत असतानाही कुस्ती लढली. अशा परिस्थितीत उत्तर कोरियाची कुस्तीपटू सोल गुम हिच्यासाठी विजयाचा मार्ग अधिक सुकर झाला आणि निशाचा २०२४च्या ऑलिम्पिकमधील प्रवास संपला.

निशाने सामन्यात दमदार सुरुवात केली होती. दुसऱ्या हाफची सुरुवात होण्यापूर्वी निशा ४-० अशी आघाडीवर होती, पण दुसऱ्या हाफमध्ये तिच्या कोपराला दुखापत झाली आणि खांद्याचा सांधा निखळला. सामन्यात एक वेळ अशी होती की, निशा ८-१ ने आघाडीवर होती, पण त्यानंतर तिला वेदना होऊ लागल्या. डॉक्टरांना तपासणीसाठी सामन्यात तब्बल तीन वेळा मॅटवर यावे लागले. या साऱ्या गोंधळात प्रतिस्पर्धी खेळाडूने सामन्याचा ताबा घेतला आणि निशाला पराभूत केले.

पराभवानंतर निशा दहियाच्या डोळ्यात अश्रू दिसत होते. तिची प्रतिस्पर्धी पैलवान सोल गुमही सामना संपल्यावर तिच्याजवळ आली आणि तिला उठण्यासाठी मदत केली. निशाने याआधी पहिल्या फेरीत युक्रेनच्या टेटियाना सोव्हाचा ६-४ अशा फरकाने पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता.

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Wrestlingकुस्तीIndiaभारत