शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

वर्ल्ड चॅम्पियन Nikhat Zareen ला मिळाली मोठी जबाबदारी; स्टार खेळाडू आता नव्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 18:48 IST

भारताची वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर निखत झरीनला मोठी जबाबदारी मिळाली आहे.

भारताची वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर निखत झरीनला मोठी जबाबदारी मिळाली आहे. निखत झरिनने तेलंगणा पोलिसात पोलीस उपअधीक्षक (DSP) म्हणून पदभार स्वीकारला आहे. पोलीस महासंचालकांनी तिला नियुक्ती पत्र सुपूर्द केले. बुधवारी रात्री जारी करण्यात आलेल्या अधिकृत पत्रकात म्हटले आहे की, राज्य सरकारने निखत जरीन हिची डीएसपी म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश जारी केले होते, त्यानंतर डीजीपी यांच्यामार्फत नियुक्ती पत्र सादर करण्यात आले. निझामाबाद जिल्ह्यातील रहिवासी असलेली निखत जरीनने दोन वेळा जागतिक बॉक्सिंग चॅम्पियन असून राष्ट्रकुल, तिने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदकही जिंकले आहे. याशिवाय आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य पदकही तिच्या नावावर आहे.

अलीकडेच पार पडलेल्या पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्येही तिचा सहभाग होता. मात्र, पदक जिंकण्यात निखतला अपयश आले. खरे तर निखतचा जन्म १४ जून १९९६ ला तेलंगणामधील निजामाबादमध्ये झाला. तिच्या वडिलांचे नाव मुहम्मद जमील अहमद आणि आईचे नाव परवीन सुल्ताना आहे. १३ वर्षांच्या वयातच निखतने बॉक्सिंग रिंगमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. निखतने दिग्गज बॉक्सर मेरी कोन हिच्याशीही अनेक वेळा बॉक्सिंग रिंगमध्ये दोन हात केले आहेत. निखत झरिनने कारकिर्दीतील पहिले पदक २०१० साली नॅशनल सब ज्युनियर मीट मध्ये मिळवलं होते. त्यानंतर वयाच्या १५व्या वर्षी निखतने देशासाठी गोल्ड मेडल मिळवले. तुर्कस्तानमध्ये २०११ साली महिला ज्युनिअर आणि युथ बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने गोल्ड जिंकले होते. 

तेलंगणाच्या डीजीपी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले की, दोन वेळा जागतिक बॉक्सिंग चॅम्पियन राहिलेली आणि ऑलिम्पिक थलीट निखत जरिनने पोलिस उपअधीक्षक म्हणून नवीन भूमिका स्वीकारल्याने आम्ही तिचे स्वागत करतो.

टॅग्स :boxingबॉक्सिंगTelanganaतेलंगणा