शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

पीळदार शरीरयष्टीसाठी नेमकं काय करायचं? आणि काय करू नये?, आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू सुहास खामकरच्या खास टीप्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 17:13 IST

नवोदितांनी खेळात परिश्रम व सातत्य ठेवावे, पुर्णतः सप्लीमेंट्सवर अवलंबून न राहता सुरूवातीला नैसर्गिकपणे सुदृढ शरीरयष्टी कमावण्याकडे भर द्यावा, स्टेरॉईडयुक्त सप्लिमेंट्स टाळाव्यात

नवोदितांनी खेळात परिश्रम व सातत्य ठेवावे, पुर्णतः सप्लीमेंट्सवर अवलंबून न राहता सुरूवातीला नैसर्गिकपणे सुदृढ शरीरयष्टी कमावण्याकडे भर द्यावा, स्टेरॉईडयुक्त सप्लिमेंट्स टाळाव्यात, शासनमान्य फेडरेशनशनकडून खेळावे असा मौलिक सल्ला आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू सुहास खामकर यांनी दिला.

बॉडीबिल्डींग खेळाला ऑलिम्पिक पात्रता मिळाल्यास अनेक दृष्टीने नवोदितांना शासनसाहाय्य मिळू शकेल, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय आयोजित गुरूवर्य स.वि.कुलकर्णी व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू सुहास खामकर यांच्या मुलाखतीने गुंफले. ठाणे जिल्हा व महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोशिएशनचे सचिव यतीन टिपणीस यांनी मुलाखत घेतली. एन.एस.एस कार्यक्रम अधिकारी प्रा.तुषार चव्हाण यांनी निवेदन तर प्राचार्य डॉ.हेमंत चित्ते यांनी प्रास्तविक केले. प्रा. सिद्धी पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. सदर व्याख्यानमालेच्या नियोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष सतीश प्रधान, सचिव कमलेश प्रधान,सह-सचिव मानसी प्रधान, खजिनदार सतीश शेठ यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले. १४ व्या वर्षापासूनच मी व्यायामावर भर दिला असला, घरात पोषक वातावरण असले तरीही या क्षेत्राकडे वळावे, अशी ओढ नव्हती. परंतू व्यायामशाळेतील सहकाऱ्यांच्या आग्रहाखातर व्यायामशाळेतील अंतर्गत स्पर्धेत भाग घेऊन उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले आणि तिथेच शरीरसौष्ठव होण्याची आंतरिक प्रेरणा जागृत झाली. शाळेत असताना सायकलचे पंक्चर काढण्याचे दुकान सांभाळून शाळा आणि नियमितपणे व्यायाम अशी तारेवरची कसरत करावी लागायची.

प्रत्येक खेळाडूसाठी खेळात सातत्य राखणे फार गरजेचे असते, प्रत्येक महिन्यात जवळजवळ १५ स्पर्धांमध्ये मी सहभागी व्हायचो, अशा शब्दांत त्यांनी आपला प्रवास उलगडला. या सातत्यामुळेच मि. एम्याच्यूर ऑलिम्पिया-चॕम्पिअन ऑफ चॕम्पिअन, मि.इंडीया, ऑल इंडीया रेल्वे बॉडीबिल्डींग महाराष्ट्र व मुंबई मि.एशिया, मि.वर्ल्ड आणि इतर अशी ५०० हून अधिक पारितोषिके त्यांनी पटकावली आहेत. २०१८ साली बॉडीबिल्डींग क्षेत्रातील मानाचे प्रो-कार्डही त्यांना २०१८ मध्ये प्राप्त झाले आहे. सुरुवातीच्या उमेदीच्या काळात कोल्हापूरच्या कर्मयोगी विक्रमसिंह घाटगे यांनी आर्थिक मदत केली तसेच अजित पवार, बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे या सर्वपक्षीय नेत्यांनी वेळोवेळी आवश्यक मदत केल्यामुळेच मी इथवर पोहचू शकलो, असे ते म्हणाले.    या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या नवोदितांना त्यांनी मार्गदर्शन केले.

टॅग्स :bodybuildingशरीरसौष्ठवOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2020