दुबई : जेम्स निशाम आणि काईल मिल्स यांच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर न्यूझीलंडने पाकिस्तान विरुद्धच्या दुस:या टी-2क् सामन्यांत 17 धावांनी विजय मिळविला़ या विजयासह न्यूझीलंडने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आह़े
न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 2क् षटकांत 8 बाद 144 धावा केल्या़ या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाक खेळाडूंचा न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर निभाव लागला नाही़ हा संघ 18़5 षटकांत 127 धावांत बाद झाला़ यामुळे दोन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली़
या लढतीत 21 धावांची उपयोगी खेळी करणारा आणि 2 बळी मिळविणारा एंटन डेव्हसिक सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला, तर न्यूझीलंडचा ल्यूक रोंचीला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आल़े न्यूझीलंड संघाकडून कर्णधार केन विलियमसन याने 32, टॉम लॅथमने 26, तर रोंचीने 31 धावांची खेळी केली़
न्यूझीलंडने माफक धावसंख्या उभारूनही पाकिस्तानला विजय मिळविता आला नाही़ किवी संघाच्या निशाम याने 25 धावांत 3, तर मिल्सने 26 धावांत 3 गडी बाद केल़े डेव्हसिकने 16 धावांत 2 गडय़ांना तंबूचा रस्ता दाखविला़ मॅट हेनरी आणि डॅनिएल व्हिट्टोरी यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला़
पाकिस्तानकडून अहमद शहजादने सर्वाधिक 33 धावांचे योगदान दिल़े शाहीद आफ्रिदी 28, साद नसीम 19, तर उमर अकमलला 1क् धावाच करता आल्या़ पाकिस्तानच्या गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली़ त्यांच्या उमर गुल आणि शाहीद आफ्रिदी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले, तर सोहेल रजा हसन, मोहंमद हाफिज यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला़ (वृत्तसंस्था)
संक्षिप्त धावफलक :
न्यूझीलंड : 2क् षटकांत 8 बाद 144़ (केन विलियमसन 32, टॉम लॅथम 26, ल्यूक रोंची 31, एंटन डेव्हसिक 21़ उमर गुल 2/24, शाहिद आफ्रिदी 2/33)़
पाकिस्तान : 18़5 षटकांत 127़ (अहमद शहजाद 33, साद नसीम 19, शाहिद आफ्रिदी 28, उमर अकमल 1क़् जेम्स निशाम 3/25, काईल मिल्स 3/26, एंटन डेव्हसिक 2/16)़