शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

नीरज चोप्राची ‘सुवर्णकमाई’; भालाफेकीत मिळवले सुवर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 03:25 IST

काही दिवसांपूर्वीच युवा धावपटू हिमा दास हिने जागतिक अ‍ॅथलेटिक्समध्ये भारताचा तिरंगा अभिमानाने फडकविल्यानंतर बुधवारी युवा भालाफेकपटू नीरज चोप्रा यानेही भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केली.

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वीच युवा धावपटू हिमा दास हिने जागतिक अ‍ॅथलेटिक्समध्ये भारताचा तिरंगा अभिमानाने फडकविल्यानंतर बुधवारी युवा भालाफेकपटू नीरज चोप्रा यानेही भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केली. भारताच्या या स्टार अ‍ॅथलिटने फ्रान्स येथे सुरू असलेल्या सोटेव्हिल अ‍ॅथलेटिक्स मीट स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. दखल घेण्याची बाब म्हणजे या स्पर्धेत २०१२ साली लंडन आॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविणाऱ्या केशोर्न वालकोट याचाही समावेश होता.जबरदस्त वर्चस्व राखलेल्या नीरजने या स्पर्धेत ८५.१७ मीटरची शानदार फेक करताना सुवर्णपदकावर कब्जा केला. नीरजच्या धडाक्यापुढे मालदोवाच्या अँड्रियन मारडेयर याला ८१.४८ मीटरच्या फेकीसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. लिथुआनियाच्या एडिस मातुसेविसियस याने ७९.३१ मीटरची फेक करीत कांस्यपदकावर नाव कोरले. त्याचवेळी, माजी आॅलिम्पिक सुवर्ण विजेत्या त्रिनिदाद टोबॅगोच्या वालकोटची कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली. त्याला ७८.२६ मीटरसह पाचव्या स्थानी समाधान मानावे लागले.पानीपतच्या २० वर्षीय नीरजने २०१६ साली जागतिक युवा अजिंक्यपद स्पर्धेत ८६.४८ मीटरची विश्वविक्रमी फेक करताना दिमाखात सुवर्णपदक पटकावले होते. त्या वेळी भारतीय अ‍ॅथलेटिक्समध्ये नीरजचाच दबदबा राहिला होता. त्याचबरोबर यंदाच्या वर्षी झालेल्या गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेतही नीरजने ‘सुवर्ण’फेक करीत भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केली होती. यानंतर दोहा येथे झालेल्या डायमंड लीग स्पर्धेमध्ये नीरजला अपेक्षित कामगिरी करण्यात यश आले नव्हते. मात्र या वेळी त्याने ८७.४३ मीटरची फेक करताना राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता. सध्याच्या काळात तो भारताचा सर्वोत्तम भालाफेकपटू आहे.नीरज चोप्राच्या या शानदार कामगिरीचे सोशल मीडियावर कौतुक होत असून, भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे (एएफआय) अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनीही ट्विटरद्वारे नीरजचे कौतुक केले आहे. (वृत्तसंस्था)>जबरदस्त कामगिरी केली नीरज. अशीच कामगिरी करीत राहा. या शानदार यशासाठी नीरज आणि त्याचे प्रशिक्षक उवे होन यांचे अभिनंदन. भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या विनंतीनंतर नीरजला प्रशिक्षकासह फिनलँडला पाठविण्यास तयार झाल्याने ‘साई’ आणि भारत सरकारचे आभार.- आदिल सुमारीवाला, अध्यक्ष - एएफआय