शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
2
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
4
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
5
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
6
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
7
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
8
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
9
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
10
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
11
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
12
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
13
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
14
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
15
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
16
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
17
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
18
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
19
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी
20
एअरपोर्टवर तरूणीच्या सामानाचं झालं 'चेकिंग'; पोलिसांनी बॅग उघडताच बसला धक्का.. आत काय निघालं?

गोल्डन बॉय नीरज चोप्रावर तिसऱ्यांदा आली ही वेळ; वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आधी वेबरची टेन्शन वाढवणारी कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 12:30 IST

नीरज चोप्रा ९० पारचा आकडा गाठण्यात संघर्ष करत असताना वेबरनं दोन वेळा केली ही कमाल

Neeraj Chopra 2nd In Diamond League Final 2025 : डायमंड लीग २०२५ स्पर्धेत नीरज चोप्रानं जोर लावला, पण शेवटी कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या जर्मनीच्या जूलियन वेबरनं एकदा नव्हे तर दोन वेळा ९० पार अंतर कापणारा भाला फेकत या स्पर्धेत फायनल बाजी मारली. पहिल्या पाच प्रयत्नानंतर नीरज चोप्रा तिसऱ्या स्थानावर होता. पण अखेरच्या थ्रोसह त्याने दुसऱ्या स्थानावर कब्जा केला. डायमंड लीग स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

नीरज चोप्रा ९० पारचा आकडा गाठण्यात संघर्ष करत असताना वेबरनं दोन वेळा केली ही कमाल

डायमंड लीगच्या फायनलमध्ये पहिल्या प्रयत्नातच जूलियन वेबरनं ९१.३७ मीटर अंतरावर भाला फेकला. दुसरीकडे नीरज चोप्राला मात्र पहिल्या प्रयत्नात फक्त ८४.३५ मीटर अंतर कापता आले. नीरजचा दुसरा थ्रो ८२ मीटरवर आला. त्यानंतर तीन प्रयत्न फाउल ठरल्यामुळे नीरज चोप्रासमोर मोठ चॅलेंज उभा राहिले. एका बाजूला नीरज जोर लावण्यात कमी पडत असताना जर्मनीच्या पठ्ठ्यानं दुसऱ्या प्रयत्नात ९१.५७ एवढ्या अंतरावर भाला फेकत अव्वलस्थानावरील आपली दावेदारी आणखी भक्कम केली अन् शेवटी बाजीही मारली. ही त्याची सर्वोत्तम कामगिरीही ठरली.

 अखेरच्या प्रयत्नात नीरजनं ऑलिम्पिक चॅम्पिनयला टाकलं मागे

डायमंड लीग स्पर्धेतील फायलमध्ये अखेरच्या प्रयत्नात नीरज चोप्रानं ८५.०१ एवढ्या अंतरावर भाला फेकत नंबर दोनवर राहण्याचा डाव साधला. या कामगिरीसह त्याने त्रिनिदाद अँण्ड टॉबेगोच्या  २०१२ च्या लंडन ऑलिम्पिक विजेत्या केशोर्न वाल्कोट याला मागे टाकले. त्याने ८४.९५ मीटर भाला फेकला. डायमंड लीगमध्ये सलग तिसऱ्यांदा नीरज चोप्रावर दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानण्याची वेळ आली आहे. 

वेबरची कामगिरी गोल्डन बॉयला टेन्शन देणारी

डायमंड लीग स्पर्धेत एकदा नव्हे तर दोन वेळा ९० पारचा डाव साधत वेबरनं जेतेपद तर मिळवलेच. पण त्याची ही कामगिरी आगामी वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेआधी भारतीय भालाफेकपटूला टेन्शन देणारी अशीच आहे. पुढच्या महिन्यात हे दोन्ही खेळाडू पुन्हा समोरासमोर येतील. त्याला मात द्यायची असेल तर फक्त ९० पारच लक्ष पार करून चालणार नाही तर नीरज चोप्राला आणखी जोर लावावा लागेल.

टॅग्स :Neeraj Chopraनीरज चोप्रा