शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Neeraj Chopra : माझ्या खांद्यावर बंदूक ठेऊन 'Propaganda' चालवू नका, नीरज चोप्राकडून पाकिस्तानच्या अर्षद नदीमचा बचाव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 15:09 IST

भारताचा सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याला टोको ऑलिम्पिक स्पर्धेच्या फायनलपूर्वी टेंशन आलं होतं.

भारताचा सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याला टोको ऑलिम्पिक स्पर्धेच्या फायनलपूर्वी टेंशन आलं होतं. त्याचा भाला पाकिस्तानचा खेळाडू अर्षद नदीम यानं घेतला होता अन् तो त्यानं सराव करत होता. भाला मिळत नसल्यानं नीरज तणावात होता अन् अखेरीस त्याला तो अर्षदच्या हाती दिसला. हा माझा भाला आहे मला दे, असे बोलून नीरजनं तो घेतला व भालाफेक केली. पण, या TOIला दिलेल्या मुलाखतीत नीरजनं सांगितलेल्या या प्रसंगानं पाकिस्तानी खेळाडूवर खालच्या पातळीवरची टीका होऊ झाली. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी हल्लाबोलच केला. पण, नीरजनं या दिवसभरातील घडामोडीवर स्पष्ट मत मांडले. त्यानं त्याच्या अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केला अन् या मुद्याचं राजकारण करणाऱ्यांना सुनावलं. ( Sports teaches us to be together and united, Say Neeraj Chopra).

काय घडलं होतं?फायनलपूर्वी भालाफेकीला जाण्यापूर्वी नीरजचा भाला गायब होता. नीरज तो भाला इकडेतिकडे शोधताना दिसला अन् तो भाला पाकिस्तानच्या नदीमच्या हातात सापडला. नीरजचा भाला घेऊन नदीम मैदानावर फिरत होता. नीरजला हे कळताच त्यानं तो त्याच्याकडून घेतला.  नीरज काय म्हणाला, ऑलिम्पिक फायनलपूर्वी मी माझा भाला शोधत होतो, मला तो सापडत नव्हता. अचानक मला तो अर्षद नदीमच्या हाती दिसला. तो माझा भाला घेऊन मैदानावर फिरत होता. तेव्हा मी त्याला म्हणालो,''भाई तो भाला मला दे तो माझाय.. मला तो फेकायचा आहे.'' त्यानं मला तो परत केला.  

आज नीरज काय म्हणाला?नीरजनं टोकियोत ८७.५८ मीटर लांब भालाफेक करून सुवर्णपदक पटकावले. तो म्हणाला, मी सर्वांचे आभार मानतो की, तुम्ही मला खूप प्रेम दिलंत, पाठिंबा दिलात. पण, आता एक मुद्दा सुरू आहे की, भालाफेकीच्या फायनलपूर्वी माझा भाला हा अर्षदच्या हाती होता, हे मी एका मुलाखतीत सांगितले. त्याचा खूप मोठा मुद्दा बनवला गेला. पण, यात काही नवीन नाही, सर्व खेळाडू त्यांचा भाला तिथे ठेवतात आणि तो अन्य खेळाडूही वापरू शकतो. त्यामुळे माझा भाला घेऊन अर्षद सराव करत होता, यात चुकीचे काहीच नाही. मला दुःख या गोष्टीचं वाटतंय की माझं नाव वापरून लोकं याचा मोठा मुद्दा करत आहेत. खेळ सर्वांना एकत्र आणतो. 

 

टॅग्स :Neeraj Chopraनीरज चोप्राOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021Pakistanपाकिस्तान