ब्राझील : विश्वचषक तोंडावर, विजेतेपदाचाही प्रबळ दावेदार, त्यातल्या त्यात ‘स्टार फॉरवर्ड’ नेयमारवर अनेकांच्या नजरा अशी स्थिती असताना ब्राझीलवासीयांची धकधक सोमवारी अचानक वाढली. कारण सराव सत्रवेळी नेयमार अचानक खाली पडला. पायाच्या घोटय़ाला दुखापत झाल्याने त्याला सराव सत्र सोडावे लागले. दुखापत गंभीर नसल्याचे संघ व्यवस्थापकडून सांगण्यात आले असले, तरी ब्राझीलवासींयाच्या मनात भीतीने घर केले आहे.
विश्वचषकात ब्राझील संघ अवघ्या तीन दिवसांनंतर आपल्या मोहिमेस क्रोएशियाविरुद्ध सुरुवात करणार आहे. त्याने आपल्या सहका:यांना पायात दुखत असल्याचे सांगितले. त्याचा घोटा दुखावला होता. त्यानंतर काही वेळ मैदानावर घालवत त्याने स्वत:ला सावरले. सोमवारी झालेल्या सराव सत्रनंतर प्रशिक्षक लुईज फेलिप स्कोलारी यांनी मैत्रीपूर्ण सामन्यात सर्बियाला 1-क्ने पराभूत करणारा संघ पाठवण्यात येईल, असे संकेत दिले आहेत. (वृत्तसंस्था)