शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पदक जिंकण्यासाठी एका विजयाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 02:02 IST

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय मुष्टीयोध्यांना मंगळवारी खूप चांगला ड्रॉ मिळाला असून, त्यात दिग्गज एम. सी. मेरी कोम हिला पदक जिंकण्यासाठी फक्त एक लढत जिंकण्याची गरज आहे, तर विकास कृष्णनला पुरुषांच्या उपउपांत्यपूर्व फेरीत बाय मिळाला आहे.

गोल्डकोस्ट - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय मुष्टीयोध्यांना मंगळवारी खूप चांगला ड्रॉ मिळाला असून, त्यात दिग्गज एम. सी. मेरी कोम हिला पदक जिंकण्यासाठी फक्त एक लढत जिंकण्याची गरज आहे, तर विकास कृष्णनला पुरुषांच्या उपउपांत्यपूर्व फेरीत बाय मिळाला आहे.मेरी कोम ८ एप्रिल रोजी ४८ किलो गटात उपांत्यपूर्व फेरीत स्कॉटलंडच्या मेगन गॉर्डनशी भिडेल. प्रथमच राष्ट्रकुल स्पर्धेत खेळणाऱ्या या मणिपूरच्या ३५ वर्षीय खेळाडूकडे सुवर्णपदकाचा दावेदार मानले जात असून, तिच्या गटात फक्त आठ खेळाडूंचा समावेश आहेत.दुसरीकडे विकास (७५ किलो) याने अंतिम १६ जणांत स्थान मिळवले आहे. विकास आणि नवोदित खेळाडू मनीष कौशिक (६0 किलो) यांना बाय मिळाला आहे. आशियाई स्पर्धेत कास्यपदक जिंकणाºया सतीश कुमार (९१ पेक्षा जास्त) यालाही छोटा ड्रॉ मिळाला असून, तोही उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. माजी विश्व व आशियाई विजेती एल. सरिता देवी (६0 किलो) किम्बरले गिटेंसविरुद्ध, तर इंडियन ओपन सुवर्ण विजेता अमित पंघाल (४९) घानाच्या टेट सुलेमानू याच्याविरुद्ध खेळेल.ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत कास्यपदक जिंकणारी पिंकी जांगडा (५१ किलो) हीदेखील उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली आहे. ११ एप्रिलला इंग्लंडच्या लिसा व्हाईटसाईड हिच्याविरुद्ध तिची लढत होईल.इंडियन ओपनमध्ये सुवर्णपदक जिंकणाºया लवलिना बोर्गोहेन (६९ किलो) पहिल्या फेरीत मिळालेल्या बायद्वारे उपांत्यपूर्व फेरी गाठणारी एकमेव भारतीय महिला बॉक्सर आहे. तिची उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंडच्या सँडी रायन हिच्याशी गाठ पडेल.पुरुष गटातील सर्वात युवा सदस्य नमन तंवर (९१ किलो) हा ६ एप्रिलला पहिल्या फेरीत तांजानियाच्या हारुणा म्हांदो याच्याविरुद्ध खेळेल. २0१0 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा मनोज कुमार (६९ किलो) याची ५ एप्रिल रोजी पहिल्या फेरीत नायजेरियाच्या ओसिता उमेह याच्याविरुद्ध लढत होईल. मुहंमद हुस्सामुद्दीन (५६ किलो) ७ एप्रिलला वुनुआतू बो वारावारा याच्याविरुद्ध, तर गौरव सोळंकी ९ एप्रिलला घानाच्या अन्नंग अम्पियासविरुद्ध लढेल.

टॅग्स :Mary Komमेरी कोमboxingबॉक्सिंगIndiaभारतCommonwealth Games 2018राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८