शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

नवीन खेळाडू घडविण्यासाठी व्यवस्थेची गरज

By admin | Updated: November 2, 2015 00:17 IST

दिग्गज टेनिसपटू रमेश कृष्णन डेव्हिस कपमध्ये गेल्या काही वर्षांपासून भारताच्या सातत्यपूर्वक चांगल्या कामगिरीने प्रभावित आहेत;

पुणे : दिग्गज टेनिसपटू रमेश कृष्णन डेव्हिस कपमध्ये गेल्या काही वर्षांपासून भारताच्या सातत्यपूर्वक चांगल्या कामगिरीने प्रभावित आहेत; परंतु संघाला पुढच्या स्तरापर्यंत घेऊन जाऊ शकणारे नवीन खेळाडू घडविणाऱ्या व्यवस्थेची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले.सोमदेव देववर्मन आणि युकी भांबरी यांच्या नेतृत्वाखाली भारत सलग १६ देशांच्या विश्व ग्रुपमध्ये स्थान मिळविण्याचा दावेदार बनत आहे. त्यांनी सप्टेंबर २0१४ मध्ये सर्बिया आणि त्यानंतर एका वर्षाने झेक प्रजासत्ताकसारख्या अव्वल संघांना आव्हान दिले; परंतु पुढे जाण्यात ते अपयशी ठरले.ते म्हणाले की, ‘आम्हाला एकेरीतील चांगल्या खेळाडूची आवश्यकता आहे. डेव्हिस कपमध्ये चार एकेरीचे सामने होतात आणि हे सत्य लपून राहिलेले नाही. विद्यमान खेळाडू कठोर मेहनत घेत आहेत आणि ते त्यांच्या कामगिरीत सुधारणा करीत राहतील; परंतु नवीन खेळाडू घडविणाऱ्या व्यवस्थेची आवश्यकता आहे.’ कृष्णन यांनी १९८७ मध्ये आॅस्ट्रेलियाच्या वॉली मसूर याच्याविरुद्ध पाचवी लढत जिंकताना भारताला डेव्हिस कपमध्ये अंतिम फेरीत पोहोचवले होते. त्यानंतर भारत फायनल्समध्ये पोहोचू शकला नव्हता. युकी व साकेत मयनेनी याची रँकिंग सुधारणे हे चांगले संकेत आहेत; परंतु अजून पल्ला खूप लांब आहे, असे आॅस्ट्रेलिया ओपन १९८९ च्या पहिल्याच फेरीत त्या वेळेसचा नंबर वन खेळाडू मॅट्स विलेंडरवर सनसनाटी विजय नोंदणाऱ्या कृष्णन यांनी म्हटले. कृष्णन यांनी १९८१, १९८७ मध्ये यूएस ओपन आणि १९८६ मध्ये विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला होता. युकी टॉप १00 मध्ये आहे, तर सोमदेव आणि साकेत यांची रँकिंग १६0 ते १८0 यादरम्यान आहे. कृष्णन स्वत: आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम २३ व्या रँकिंगवर पोहोचले होते. कृष्णन यांना डेव्हिस कप कर्णधार म्हणून दुसऱ्या डावास सुरुवात करण्याची इच्छा आहे का, असे विचारले असता त्यांनी याविषयी इच्छा नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, आमच्या जवळ चांगला डेव्हिस कपचा संघ आहे आणि उत्तम कर्णधार आहे. सर्व काही व्यवस्थित आहे. (क्रीडा प्रतिनिधी)