शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
2
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
3
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
4
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
5
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
7
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
8
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
9
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
10
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
11
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
12
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
13
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
14
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
15
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
16
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
17
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
18
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
19
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम रेल्वेला नौदलाची धडक

By admin | Updated: November 11, 2014 02:11 IST

उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन करताना भारतीय नौदलाने बलाढय़ पश्चिम रेल्वेला जोरदार धडक देताना 49व्या मुंबई सुवर्ण चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत ‘क’ गटात 4-3 अशी विजयी आगेकूच केली.

मुंबई : उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन करताना भारतीय नौदलाने बलाढय़ पश्चिम रेल्वेला जोरदार धडक देताना 49व्या मुंबई सुवर्ण चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत ‘क’ गटात 4-3 अशी विजयी आगेकूच केली.
मुंबई हॉकी संघटनेच्या (एमएचएएल) वतीने संघटनेच्या चर्चगेट येथील स्टेडियमवर पार पडलेला हा सामना अत्यंत चुरशीचा व रंगतदार झाला. निर्णायक विजयाच्या उद्देशाने मैदानात उतरलेल्या नौदल संघाच्या खेळाडूंची देहबोली अत्यंत सकारात्मक दिसली. सुरुवातीपासूनच गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण करताना नौदलाने बलाढय़ पश्चिम रेल्वेला दडपणाखाली आणले.
अमित गोस्वामीने उजव्या बाजूने तुफान आक्रमण करताना 23व्या मिनिटाला मैदानी गोल करताना नौदलाला आघाडी मिळवून दिली. यानंतर 41व्या मिनिटाला मिळालेला पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावताना नवीन कुमारने अप्रतिम गोल करीत नौदलाची आघाडी 2-क् अशी भक्कम केली. मात्र पश्चिम रेल्वेदेखील सहजासहजी हार मानण्यास तयार नव्हती. 43व्या मिनिटाला अमित रोहिदासने पेनल्टी कॉर्नरवर गोल करताना रेल्वेची पिछाडी 1-2 अशी कमी केली.
मध्यांतरानंतर दोन्ही संघांनी आक्रमक खेळ करताना सामन्याची रंगत वाढवली. मलक सिंगने 56व्या मिनिटाला रेल्वेचा दुसरा गोल करताना सामना 2-2 असा बरोबरीत आणला. या वेळी रेल्वे बाजी पलटवणार असे दिसत होते. मात्र नौदलाने जोरदार प्रत्युत्तर देताना मोक्याच्या वेळी रेल्वेची चेन खेचली. नवीन कुमार व मोहम्मद फहीम खान यांनी अनुक्रमे 62व्या व 64व्या मिनिटाला शानदार गोल करताना नौदलाला 4-2 अशा भक्कम आघाडीवर नेले. तर 69व्या मिनिटाला पुन्हा एकदा मलक सिंगने आपला हिसका दाखवताना शानदार गोल करीत रेल्वेचे आव्हान 3-4 असे जिवंत ठेवले.  (क्रीडा प्रतिनिधी)