शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धा : श्रुती पांडे, हिमांशु जैन यांनी पटकाविले रौप्यपदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 20:26 IST

सिनिअर गटात सहभागी होऊन श्रुती पांडे हिने टम्बलिंगमध्ये प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंवर मात करीत व्यक्तिगत रौप्यपदक पटकाविले. सिनिअर गटातच हिमांशु जैन याने केरळ, गोवा राजस्थान, गुजरात, दिल्ली संघातील प्रतिस्पर्ध्यांना नमवून महाराष्ट्र संघाला रौप्यपदक मिळवून दिले. 

अमरावती : श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ व जिल्हा हौशी जिम्नॅस्टिक्स संघटनेचे खेळाडू श्रुती पांडे व हिमांशु जैन यांनी २४ ते २६ मे दरम्यान डोंबिवली (मुंबई) येथील श्रवण स्पोर्ट्स अ‍ॅकेडमीमध्ये पार पडलेल्या नवव्या टम्बलिंंग, ट्रम्पोलीन जिम्नॅस्टिक्स राष्ट्रीय स्पर्धेत पदकांची कमाई केली. राज्य जिम्नॅस्टिक्स संघटनेच्या संघात सिनिअर गटात सहभागी होऊन श्रुती पांडे हिने टम्बलिंगमध्ये प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंवर मात करीत व्यक्तिगत रौप्यपदक पटकाविले. सिनिअर गटातच हिमांशु जैन याने केरळ, गोवा राजस्थान, गुजरात, दिल्ली संघातील प्रतिस्पर्ध्यांना नमवून महाराष्ट्र संघाला रौप्यपदक मिळवून दिले. हिमांशु जैन हा डीग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनचा विद्यार्थी असून, मागील दहा वर्षांपासून तो सातत्याने सराव करीत आहे. संघ प्रशिक्षक एकता पाध्ये, संजय हिरोडे, एनआयएस प्रशिक्षक सचिन कोठारे, नंदकिशोर चव्हाण, अजय सिन्हा यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकर वैद्य यांनी खेळाडूंचे कौतुक केले. श्री हव्याप्र मंडळ व अमरावती जिल्हा हौशी जिम्नॅस्टिक संघटनेचे सचिव तसेच राज्य जिम्नॅस्टिक संघटनेच्या उपाध्यक्ष माधुरी चेंडके, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष रवींद्र खांडेकर, उपाध्यक्ष विकास कोळेश्वर, कोषाध्यक्ष राजेश पांडे, कोषाध्यक्ष सु.ह. देशपांडे, प्राचार्य के.के. देबनाथ , उपप्राचार्य एस.पी. देशपांडे, मंडळाचे उपाध्यक्ष श्रीकांत चेंडके, प्राचार्य ए.बी. मराठे, विभागीय उपसंचालक प्रतिभा देशमुख, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, विलास मराठे, सी.एन. कुळकर्णी, कमलाकर शहाणे, विकास पाध्ये, मधुकर कांबे, अनंत निंबोळे, रवि दलाल, कविता वाटाणे, राजभाऊ महात्मे, ललित शर्मा आदींनी विद्यार्थ्यांचा गौरव केला.

टॅग्स :Amravatiअमरावती