राष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धा : श्रुती पांडे, हिमांशु जैन यांनी पटकाविले रौप्यपदक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 08:24 PM2019-06-03T20:24:53+5:302019-06-03T20:26:17+5:30

सिनिअर गटात सहभागी होऊन श्रुती पांडे हिने टम्बलिंगमध्ये प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंवर मात करीत व्यक्तिगत रौप्यपदक पटकाविले. सिनिअर गटातच हिमांशु जैन याने केरळ, गोवा राजस्थान, गुजरात, दिल्ली संघातील प्रतिस्पर्ध्यांना नमवून महाराष्ट्र संघाला रौप्यपदक मिळवून दिले. 

National gymnastics competition: Shruti Pandey, Himanshu Jain won silver medal | राष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धा : श्रुती पांडे, हिमांशु जैन यांनी पटकाविले रौप्यपदक

राष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धा : श्रुती पांडे, हिमांशु जैन यांनी पटकाविले रौप्यपदक

Next

अमरावती : श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ व जिल्हा हौशी जिम्नॅस्टिक्स संघटनेचे खेळाडू श्रुती पांडे व हिमांशु जैन यांनी २४ ते २६ मे दरम्यान डोंबिवली (मुंबई) येथील श्रवण स्पोर्ट्स अ‍ॅकेडमीमध्ये पार पडलेल्या नवव्या टम्बलिंंग, ट्रम्पोलीन जिम्नॅस्टिक्स राष्ट्रीय स्पर्धेत पदकांची कमाई केली. 
राज्य जिम्नॅस्टिक्स संघटनेच्या संघात सिनिअर गटात सहभागी होऊन श्रुती पांडे हिने टम्बलिंगमध्ये प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंवर मात करीत व्यक्तिगत रौप्यपदक पटकाविले. सिनिअर गटातच हिमांशु जैन याने केरळ, गोवा राजस्थान, गुजरात, दिल्ली संघातील प्रतिस्पर्ध्यांना नमवून महाराष्ट्र संघाला रौप्यपदक मिळवून दिले. 
हिमांशु जैन हा डीग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनचा विद्यार्थी असून, मागील दहा वर्षांपासून तो सातत्याने सराव करीत आहे. संघ प्रशिक्षक एकता पाध्ये, संजय हिरोडे, एनआयएस प्रशिक्षक सचिन कोठारे, नंदकिशोर चव्हाण, अजय सिन्हा यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकर वैद्य यांनी खेळाडूंचे कौतुक केले. श्री हव्याप्र मंडळ व अमरावती जिल्हा हौशी जिम्नॅस्टिक संघटनेचे सचिव तसेच राज्य जिम्नॅस्टिक संघटनेच्या उपाध्यक्ष माधुरी चेंडके, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष रवींद्र खांडेकर, उपाध्यक्ष विकास कोळेश्वर, कोषाध्यक्ष राजेश पांडे, कोषाध्यक्ष सु.ह. देशपांडे, प्राचार्य के.के. देबनाथ , उपप्राचार्य एस.पी. देशपांडे, मंडळाचे उपाध्यक्ष श्रीकांत चेंडके, प्राचार्य ए.बी. मराठे, विभागीय उपसंचालक प्रतिभा देशमुख, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, विलास मराठे, सी.एन. कुळकर्णी, कमलाकर शहाणे, विकास पाध्ये, मधुकर कांबे, अनंत निंबोळे, रवि दलाल, कविता वाटाणे, राजभाऊ महात्मे, ललित शर्मा आदींनी विद्यार्थ्यांचा गौरव केला.

Web Title: National gymnastics competition: Shruti Pandey, Himanshu Jain won silver medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.