शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा नोव्हेंबरमध्ये!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 19:33 IST

आयओएचे महासचिव राजीव मेहतांचे संकेत : आज क्रीडामंत्री, मुख्यमत्र्यांनाही भेटणार

पणजी : मार्च-एप्रिलमध्ये ठरलेली राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा निवडणुकीच्या कारणांमुळे लांबणीवर न्यावी, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. मात्र, भारतीय आॅलिम्पिक संघटनेकडे ही स्पर्धा पुढे ढकलण्याचा पर्याय उपलब्ध आहे किंवा नाही, हे अजून स्पष्ट झाले नव्हते. त्यामुळे भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे महासचिव राजीव मेहता आणि स्पर्धेच्या तांत्रिक समितीचे अध्यक्ष मुकेश कुमार सोमवारी गोव्यात दाखल झाले. त्यांनी पहिल्याच दिवशी मुख्य सचिवांसोबत बैठक घेतली. या बैठकीत स्पर्धेसाठीची सद्यस्थिती आणि भविष्यातील अडचणी यावर चर्चा करण्यात आली. ही स्पर्धा गोव्यातच व्हावी, अशी इच्छा राज्य सरकारची आहे. परंतु, काही कारणांमुळे आम्ही ती पुढे ढकलण्याची विनंती केली, असे मुख्य सचिवांनी मेहता यांना सांगितले. यावर मेहता यांनी स्थिती समजून घेत स्पर्धा गोव्यातच होईल, असे संकेत दिले. त्यामुळे ही स्पर्धा आता सप्टेंबर-नोव्हेंबर दरम्यान होईल, हे सध्यातरी निश्चित झाले आहे. राजीव मेहता हे गोव्यातील स्पर्धेबाबत अजूनही सकारात्मक असून त्यांना सरकारकडून ठोस आश्वासनाची अपेक्षा आहे. मात्र, स्पर्धेच्या आयोजनाबाबतचा एकंदरीत इतिहास पाहता मेहतांच्या मनात प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे ते उद्या (दि.२९) क्रीडामंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेतील. या बैठकीत स्पर्धेच्या भवितव्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. स्पर्धा मार्च-एप्रिलमध्ये होणार नाही, यावर मात्र शिक्कामोर्तब झाले. राजीव मेहता यांचे सोमवारी दुपारी २ वाजता आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी स्पर्धेचे सीईओ तसेच गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक व्ही. एम. प्रभुदेसाई, गोवा आॅलिम्पिक संघटनेचे सचिव गुरुदत्त भक्ता, खजिनदार परेश कामत, कबड्डी संघटनेचे सचिव नीलेश खांडेपारकर, दत्ता कामत, अनघा वरळीकर व इतर उपस्थित होते. गोव्यात येताच मेहता यांनी मुख्य सचिवांची भेट घेतली. त्यानंतर संध्याकाळी राजीव मेहता यांच्यासाठी खास डिनर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात राज्यातील विविध संघटनांचे अध्यक्ष तसेच सचिव आणि गोवा आॅलिम्पिक संघटनेच्या पदाधिकाºयांंचा समावेश होता. 

मी आज गोव्याच्या मुख्य सचिवांसोबत चर्चा केली. ही बैठक फलदायी झाली. कदाचित, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दोन-तीन महिन्यांनी पुढे ढकलण्यात येतील. उद्या मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासोबत महत्वपूर्ण बैठक होईल. आयओएचे वरिष्ठ पदधिकारी ही स्पर्धा पुढे ढकलण्याच्या मनस्थितीत नाही. परंतु, मी त्यांना येथील परिस्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न करीन, ही स्पर्धा आम्ही सप्टेंबर-नोव्हेंबरमध्ये घेउ शकतो. राजीव मेहता (महासचिव, भारतीय आॅलिम्पिक संघटना)

टॅग्स :goaगोवा