शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
2
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
3
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
4
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
5
Raksha Bandhan 2025 SIP Gift: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
6
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’
7
'मंजिल आने वाली है...' कोडवर्ड देत पतीला कायमचं संपवलं; प्रियकरासोबत पत्नीनं रचलं क्रूर षडयंत्र
8
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
9
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."
10
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या स्टॉकमध्ये हेवी बाईंग; मोतीलाल ओसवालपासून अनेक ब्रोकरेज बुलिश
11
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुजवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
12
Abu Azmi: "माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी", राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर अबू आझमींची प्रतिक्रिया
13
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
14
तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड?
15
भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?
16
लय भारी! Instagram युजर्सची धमाल; Repost, Maps, Friends फीचर्सचा मजेदार अनुभव
17
१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज
18
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
19
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
20
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?

नरसिंग यादवच्या रुममध्ये घुसखोरी, जेवणात औषध मिसळणा-याची ओळख पटली

By admin | Updated: July 27, 2016 11:38 IST

कुस्तीपटू नरसिंग यादवच्या जेवणात भेसळ करणा-याची ओळख पटली असल्याची माहिती मिळत आहे, पोलीस ठाण्यात तक्रार नोंद

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 27 - कुस्तीपटू नरसिंग यादवच्या जेवणात भेसळ करणा-याची ओळख पटली असल्याची माहिती मिळत आहे. ही व्यक्ती एका आंतरराष्ट्रीय कुस्तीपटूचा भाऊ असून नरसिंग यादवच्या रुममध्ये घुसखोरी करुन जेवणात बंदी असलेलं औषध मिसळल्याचा आरोप करण्यात आला आहे. नरसिंगने याअगोदरही सोनिपत शिबिराच्या वेळी जेवणात किंवा फुड सप्लिमेंटमध्ये बंदी असलेले औषध मिसळण्यात आले असण्याची शक्यता व्यक्त केली होती. 
 
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार ही व्यक्ती स्वत: 65 किलो वजनी गटातील कुस्तीपटू आहे. ही व्यक्ती दिल्लीतील छत्रसाल स्टेडिअममध्ये प्रशिक्षण देतो तसंच साई (स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया) सोनिपत सेंटरलाही नॅशनल कॅम्पदरम्यान येणे जाणे असते. नरसिंग यादव भारतीय संघासोबत बल्जेरियामध्ये असताना या व्यक्तीला नरसिंगच्या रुमबाहेर फिरताना पाहण्यात आलं होतं. नरसिंग यादवच्या गैरहजेरीत या व्यक्तीने के डी जाधव हॉस्टेलमध्ये नरसिंगच्या रुमची चावीदेखील मागितली होती. जेव्हा चौकशी करण्यात आली तेव्हा ही पवनची रुम आहे ना ? असं सागंत दुर्लक्ष करुन निघून गेला. 
 
(नरसिंग यादवसाठी मुख्यमंत्री फडणवीस मैदानात, क्रीडामंत्र्यांना लिहिलं पत्र)
 
भारतीय कुस्ती महासंघाने दिलेल्या माहितीनुसार पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आहे. तक्रार देण्यासाठी नरसिंग यादव स्वत: हजर होता. फूड सप्लिमेंट आणि पाण्यामध्ये काही लोकांनी भेसळ केल्याचा नरिसंग यादवला संशय असल्याची माहिती हरियाणा पोलिसांनी दिली आहे. 
 
दरम्यान नरसिंग यादवचे रिओ ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आले असून नरसिंगऐवजी परवीन राणाला संधी देण्यात आली आहे. नरसिंग व त्याच्यासह रूममध्ये असलेला संदीप यादव बंदी असलेले अ‍ॅनाबॉलिक स्टेरॉईड मिथाएंडिनोनसाठी पॉझिटिव्ह आढळले. त्यानंतरच्या दिवशी भारतीय कुस्ती महासंघाने नरसिंगची पाठराखण करताना त्याला रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यापासून रोखण्यासाठी केलेला हा कट असल्याचे म्हटले आहे.
 
 
डोपिंगमध्ये अडकलेल्या नरसिंगने आज या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, डोपिंगमध्ये दोषी आढळलेला मल्ल नरसिंग यादव याला रिओ आॅलिम्पिकला पाठविण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे. स्वत:चा बचाव करण्याची त्याला पुरेपूर संधी दिली जाईल, असे क्रीडामंत्री विजय गोयल यांनी सोमवारी स्पष्ट केले. सिंग यांनी सांगितले, की नरसिंगची तक्रार क्रीडा मंत्रालयाकडे पाठविण्यात आली आहे. सरकारने हे प्रकरणा गांभीर्याने घेतले असून त्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. मी विश्व कुस्ती महासंघ (फिला) आणि नाडा या संस्थांना या कटाबाबत माहिती दिली आहे. मी सातत्याने विश्व कुस्ती महासंघाच्या संपर्कात असून या प्रकरणातील घडामोडींबाबत त्यांना माहिती देत आहे.