Naomi Osaka Announces Split With Partner Rapper Cordae : टेनिस जगतातील कामगिरीमुळे चर्चेत असणारी चार वेळची ग्रँडस्लॅम चॅम्पियन नाओमी ओसाका ही वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आली आहे. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेला अवघे काही दिवस उरले असताना प्रसिद्ध महिला टेनिस स्टारनं पार्टनरपासून वेगळे झाल्याची घोषणा केली आहे. सोशल मीडियावरील एका पोस्टच्या माध्यमातून तिने पार्टन रॅपर कॉर्डे याच्यासोबतच नातं तुटल्याचे सांगितले आहे. नाओमी ओसाका हिने २०१९ आणि २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली होती. एवढेच नाही तर तिने दोन वेळा अमेरिकन ओपन स्पर्धाही गाजवली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
२०२३ मध्ये दिला पहिल्या अपत्याला जन्म; पार्टनरसोबत आनंदानं केलं होतं लेकीचं स्वागत
अमेरिकेत जन्मलेली जपानी टेनिस स्टार नाओमी ओसाका आणि कॉर्डे या जोडीनं जुलै २०२३ मध्ये मुलीचं स्वागत केले होते. ओसाका जवळपास १५ महिन्यांच्या ब्रेकनंतर ती पुन्हा एकदा टेनिस कोर्टवर उतरल्याचे पाहायला मिळाले होते. आता ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेआधी ती सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आलीये.
पार्टनरसंदर्भात खास पोस्ट शेअर करत शेअर केली त्याच्यापासून वेगळे झाल्याची स्टोरी
नाओमी ओसाका हिने सोशल मीडियावरु जी पोस्ट केलीये त्यात तिने लिहिलंय की, मनात कोणताही वाईट विचार नाही. तो एक चांगला व्यक्ती आणि पिता होता. प्रामाणिकपणे सांगायचं तर आम्ही दोघे एकत्र आलो तो आयुष्यातील खास आणि आनंदी क्षण होता. माझी मुलगी हा माझ्यासाठी मोठा आशिर्वाद आहे. पार्टनरसोबतच्या चांगल्या आठवणीसह लेकीसोबत पुढचा प्रवास करायला सक्षम आहे. कमबॅकनंतर निराशजनक कामगिरी
मुलीला जन्म दिल्यावर नाओमी ओसाकानं टेनिस कोर्टवर कमबॅक केले. पण तिच्या खेळात पहिल्यासारखी जादू दिसली नाही. २०२३ मध्ये एकाही ग्रँडस्लॅमचा ती भाग नव्हती. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतून तिने कमबॅक केले. पण पहिल्या फेरीत तिला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर फ्रेंच ओपन, विंम्बल्डन आणि यूएस ओपन स्पर्धेत तिचा प्रवास हा दुसऱ्या फेरीपर्यंत मर्यादित राहिला. नाओमी ओसाका ही अशी टेनिस स्टार आहे जी ग्रँडस्लॅम स्पर्धेत क्वार्टर फायनल, सेमी किंवा फायनलमध्ये कधीच पराभूत झालेली नाही. ती क्वार्टर फायनलमध्ये पोहचली की ती विजेती ठरते, असा तिचा रेकॉर्ड आहे.