शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

नमन कनोई, झिला माओ सर्वोत्तम खेळाडू

By admin | Updated: December 14, 2015 02:41 IST

डी. जी. खेतान इंटरनॅशनल स्कूलच्या नमन कनोई आणि जमनाबाई नरसी स्कूलच्या झिला माओ यांनी शानदार कामगिरी करताना नुकताच झालेल्या ३८व्या प्रबोधन आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत अनुक्रमे

मुंबई : डी. जी. खेतान इंटरनॅशनल स्कूलच्या नमन कनोई आणि जमनाबाई नरसी स्कूलच्या झिला माओ यांनी शानदार कामगिरी करताना नुकताच झालेल्या ३८व्या प्रबोधन आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत अनुक्रमे मुलांच्या व मुलींच्या अ‍ॅथलेटिक्स गटात सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला. विशेष म्हणजे या दोघांनी स्पर्धेत प्रत्येक एक स्पर्धा विक्रमाची नोंदही केली. त्याचवेळी अ‍ॅथलेटिक्समध्ये बलाढ्य चिल्ड्रन्स अकादमीचे एकहाती वर्चस्व राहिले. चिल्ड्रन्स अकादमी (मालाड) संघाने सांघिक विजेतेपदावर कब्जा केला, तर आशानगर चिल्ड्रन्स अकादमी संघाने उपविजेतेपद पटकावले.१४ वर्षांखालील वयोगटामध्ये नमनने गोळाफेक प्रकारात स्पर्धा विक्रम करताना १४.७४ मीटरची जबरदस्त फेक केली. त्याचप्रमाणे थाळीफेकमध्येही नमनने सुवर्णपदक पटकावताना ३१.२८ मीटरची फेक करून बाजी मारली. दुसऱ्या बाजूला मुलींमध्ये झिलाचे वर्चस्व राहिले. १६ वर्षांखालील गटातून सहभागी होताना तिने ४०० मीटर शर्यतीत ६३.८ सेकंद अशी वेळ देत स्पर्धा विक्रम नोंदवला. त्याचप्रमाणे २०० मीटर व ८०० मीटर शर्यतीमध्येदेखील बाजी मारताना झिलाने स्पर्धेत आपला दबदबा राखला.झिलाप्रमाणेच मेरी इम्याक्युलेट (पोयसर) संघाच्या अनुष्का भंडारीनेही तीन सुवर्ण कमाई करताना सर्वांचे लक्ष वेधले. मात्र झिलाने स्पर्धा विक्रम नोंदवण्याची निर्णायक कामगिरी करीत बाजी मारली. अनुष्काने २०० मीटर, ६०० मीटर आणि लांब उडीमध्ये सुवर्ण पटकावले. तसेच मुलांच्या १६ वर्षांखालील गटात सेंट लॉरेन्सच्या (कांदिवली) शुभम पाटेकरने उंच उडी व लांब उडीमध्ये बाजी मारत सुवर्णपदकावर नाव कोरले. अ‍ॅथेलेटिक्सच्या सांघिक कामगिरीमध्ये अपेक्षेप्रमाणे बलाढ्य चिल्ड्रन्स अकादमीच्या खेळाडूंचे वर्चस्व राहिले. मालाडच्या चिल्ड्रन्स संघाने सर्वाधिक ८९ गुणांसह स्पर्धेत आघाडी राखताना सांघिक विजेतेपदावर कब्जा केला. त्याचबरोबर आशानगर चिल्ड्रन्स अकादमी संघाने ६८ गुणांसह उपविजेतेपद उंचावले. (क्रीडा प्रतिनिधी)