शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
5
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
6
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
7
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
8
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
9
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
10
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
11
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
12
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
13
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
14
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
15
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
16
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
17
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
19
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
20
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर

नाईकांचा ‘लेटर’ बाऊन्सर

By admin | Updated: October 30, 2015 22:33 IST

टीम इंडियाचे संचालक रवी शास्त्री आणि गोलंदाजी कोच भारत अरुण यांच्यावर कठोर कारवाई करण्याची विनंती वानखेडे स्टेडियमचे क्यूरेटर सुधीर नाईक यांनी बीसीसीआयला पत्राद्वारे केली आहे

मुंबई : टीम इंडियाचे संचालक रवी शास्त्री आणि गोलंदाजी कोच भारत अरुण यांच्यावर कठोर कारवाई करण्याची विनंती वानखेडे स्टेडियमचे क्यूरेटर सुधीर नाईक यांनी बीसीसीआयला पत्राद्वारे केली आहे. सूत्रानुसार भारतीय संघ व्यवस्थापनाला चेंडू वळण घेणारी खेळपट्टी हवी होती. क्यूरेटर यांना हे निर्देश सामन्याच्या दोन दिवस आधी मिळाले. नाईक यांनी पत्रात लिहिले, ‘सामन्याचे आयोजन असेल तर बीसीसीआय किमान १२ दिवस आधी खेळपट्टीबाबत सूचना देते. यंदा काहीच सूचना आल्या नव्हत्या. आम्ही फलंदाजांना पूरक खेळपट्टी बनविली. सामन्याच्या दोन दिवस आधी वळण घेणाऱ्या खेळपट्टी बनविण्याची सूचना मिळाली. विकेट आधीच तयार झाली असल्याने ऐनवेळी जे काही करता आले ते केले. त्यात खेळपट्टीवर पाणी न टाकणे, गवत काढणे आणि रोलिंग न करणे आदी बाबींचा समावेश आहे.’संघ व्यवस्थापनाने केवळ गुड लेंग्थ एरियापर्यंत पाणी देण्यास सांगितले होते. क्यूरेटर या नात्याने मला हे अयोग्य वाटले. यामुळे खेळपट्टी दोन रंगांची दिसते. याशिवाय प्रसन्ना यांनी देखील पाणी न टाकण्याचा सल्ला दिला होता. पहिला डाव आटोपताच रवी शास्त्री मला म्हणाला, ‘चांगले काम केले सुधीर! फारच छान खेळपट्टी आहे. यावर मी थँक्स म्हटले. नंतर लगेच त्यांनी मला शिव्या हासडल्या आणि ड्रेसिंग रुममध्ये निघून गेले. माझे सहायक रमेश महामुंकर यांच्यावर अरुण यांनी पीचवर पाणी टाकण्यासाठी दडपण आणल्यामुळे त्यांचीही तक्रार केली आहे. अरुण यांनी रमेशला शिव्या दिल्या. काल रात्रीपासून तुला सांगत आहोत पण माझे तू एकले नाहीस. असेही दरडावून सुनावले.’ (वृत्तसंस्था)मोहाली : भारत-द. आफ्रिका यांच्यात सुरू होत असलेल्या कसोटी मालिकेची सुरुवात मोहालीच्या पहिल्या कसोटी सामन्यापासून होईल. या खेळपट्टीवर सुरुवातीला वेगवान आणि नंतर फिरकी गोलंदाजांना मदत मिळत असल्याने मोहालीची खेळपट्टी कसोटीअनुरूप असल्याचे मत पंजाब क्रिकेट संघटनेचे सचिव एम.पी. पांडोव यांनी व्यक्त केले आहे.आम्ही चांगली खेळपट्टी तयार केली असून त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. फलंदाज असो की गोलंदाज सर्वांना समान संधी असेल. या खेळपट्टीवर सरुवातीला वेगवान मारा प्रभावी ठरेल. नंतर खेळपट्टीला भेगा गेल्या की फिरकी मारा सरस ठरेल. आऊटफिल्ड हिरवेगार असल्याने पाच दिवसाच्या सामन्यासाठी ही खेळपट्टी उपयुक्त ठरावी.’टी-२० आणि वन डे मालिका गमविणारा भारतीय संघ विराट कोहलीच्या नेतृत्वात ५ ते ९ नोव्हेंबर दरम्यान आयोजित पहिली कसोटी जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार आहे. द. आफ्रिका संघाचे १ नोव्हेंबर रोजी येथे आगमन होत आहे. भारतीय संघ दिल्लीत हरभजनच्या स्रेहभोजनाला उपस्थित राहिल्यानंतर २ नोव्हेंबर रोजी दाखल होईल. तिकीट विक्रीत कुठलाही उत्साह दिसत नाही. आतापर्यंत हजार तिकिटे विकली गेली. पांडोव यांनी कसोटी सामन्याच्या तिकीट विक्रीचे दर घटविण्यास सहमती दर्शविली. ते म्हणाले,‘अलिकडे कसोटी सामन्यांकडे प्रेक्षक पाठ फिरवित असल्याने तिकीटदर अत्यल्प असावे असे माझे मत आहे.’सामन्यादरम्यान पावसाची शक्यता वाटतेपांडोव म्हणाले, ‘मोहाली मैदानावर पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याची उत्कृष्ट व्यवस्था आहे. दोन दिवस मुसळधार पाऊस पडला तरी दोन तासांत पुढील खेळ सुरू होऊ शकतो. हिवाळा सुरू होण्याआधी पावसाने येथे हजेरी लावली आहे. हवामानामुळे सामन्यात व्यत्यय येऊ नये यासाठी आम्ही सज्ज आहोत.’ वन डे आणि टी-२० सामन्यांदरम्यान प्रेक्षकांनी केलेल्या गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर येथे कडक उपाययोजना असेल. प्रेक्षकांना बाहेरून काहीही घेऊन जाण्याची परवानगी नाही. बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर आणि सचिव अनुराग ठाकूर मोहालीत येणार आहेत. याशिवाय सर्व निवडकर्ते सामन्यादरम्यान हजेरी लावणार असल्याची माहिती पांडोव यांनी दिली. अरुण कोण आहे आणि कुठल्या नात्याने त्याने माझ्या सहायकावर दडपण आणले हे मी संघ व्यवस्थापनाला विचारू इच्छितो. अरुणचे काम गोलंदाजांना कोचिंग देण्याचे आहे. शास्त्रीने मला देखील शिव्यांची लाखोळी वाहिली. या प्रकाराबद्दल दोघांनाही शिक्षा व्हावी. - सुधीर नाईक