शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

नदाल १४ व्यांदा स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 05:34 IST

ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ; अलेक्झांद्र झ्वेरेवचा धक्कादायक पराभव

मेलबर्न : स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदालने याने विक्रमी १४ व्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याने फ्रान्सच्या एड्रियन मनारिनो याचा सरळ तीन सेटमध्ये पराभव करत दिमाखात आगेकूच केली. पुढील फेरीत नदाल कॅनडाच्या डेनिस शापोवालोवविरुद्ध खेळेल. दुसरीकडे, जर्मनीच्या अलेक्झांद्र झ्वेरेवचे आव्हान चौथ्या फेरीतच संपुष्टात आले.

नदालने शानदार विजयासह आगेकूच करताना मनारिनोचा ७-६(१६-१४), ६-२, ६-२ असा पराभव केला. पहिला गेम टायब्रेकमध्ये रोमांचकरीत्या रंगला. यावेळी पहिला गेम टायब्रेकमध्ये जिंकण्यासाठी नदालला तब्बल २८ मिनिटे ४० सेकंदापर्यंत झुंजावे लागले. मात्र यानंतर नदालने सलग दोन सेटमध्ये आक्रमक खेळ करत आपला दर्जा दाखवून दिला. यासह विश्वविक्रमी २१वे ग्रँडस्लॅम जेतेपद उंचावण्यापासून नदाल केवळ तीन विजय दूर राहिला आहे. ऑस्ट्रेलियन ओपनची उपांत्यपूर्व फेरी १४ व्यांदा गाठत नदालने अशी कामगिरी करणाऱ्या जॉन न्यूकॉम्बच्या कामगिरीशी बरोबरी केली. दिग्गज रॉजर फेडररने या स्पर्धेत सर्वाधिक १५वेळा उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. तसेच नदालने ४५व्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली असून या विक्रमात तो रॉजर फेडरर (५८) आणि नोवाक जोकोविच (५१) यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.

सानिया-राम उपांत्यपूर्व फेरीतभारताच्या सानिया मिर्झाने अमेरिकन साथीदार राजीव रामसोबत खेळताना मिश्र दुहेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. दोघांनी सरळ दोन सेटमध्ये बाजी मारत एलेन पेरेज-मात्वे मिडलकूप  यांचा ७-६(८-६), ६-४ असा   पराभव केला. स्पर्धेत सानियाच्या रुपाने एकमेव भारतीय आव्हान आहे.

n महिला एकेरीत फ्रेंच ओपन विजेत्या बारबरा क्रेजिकोवाने दोन वेळच्या ऑस्ट्रेलियन विजेत्या विक्टोरिया अजारेंकाचा ६-२, ६-२ असा सरळ दोन सेटमध्ये धुव्वा उडवला. पुढील फेरीत क्रेजिकोवाला २०१७ सालच्या अमेरिकन विजेत्या मेडिसन कीजविरुद्ध खेळावे लागेल. कीजने आठव्या मानांकित पॉला बाडोसाला ६-३, ६-१ असे नमवले. 

n नदाल उपांत्यपूर्व फेरीत              

शापोवालोवच्या कडव्या आव्हानास सामोरा जाईल. शापोवालोवने स्पर्धेतील धक्कादायक निकाल नोंदवत तिसरे मानांकन प्राप्त झ्वेरेवला  स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. यासह शापोवालोवने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व    फेरीत प्रवेश केला. n १४ व्या मानांकित शापोवालोवने ऑलिम्पिक सुवर्ण विजेत्या झ्वेरेवचा ६-३, ७-६(७-५), ६-३ असा सरळ तीन सेटमध्ये पराभव केला. 

टॅग्स :Tennisटेनिस