शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
4
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
6
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
7
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
8
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'
9
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
10
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
11
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
12
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
13
डेस्कटॉप पुन्हा फॉर्मात! वेगवान कामगिरी आणि सोयीमुळे मागणीत वाढ
14
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
15
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या
16
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
17
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
18
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
19
...तर तुम्हा-आम्हाला स्वस्त वीज मिळेल! खासगी कंपन्यांच्या प्रवेशाने महाराष्ट्राच्या वीज बाजारात स्पर्धा वाढणार
20
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग

नदाल पराभूत, सेरेनाची आगेकूच

By admin | Updated: September 6, 2015 00:09 IST

स्पेनचा आठवा मानांकित आणि १४ वेळेचा ग्रॅण्डस्लॅम विजेता राफेल नदाल अमेरिकन ओपन टेनिसमध्ये गेल्या एका दशकात सर्वांत खराब कामगिरीसह शनिवारी स्पर्धेबाहेर पडला.

न्यूयॉर्क : स्पेनचा आठवा मानांकित आणि १४ वेळेचा ग्रॅण्डस्लॅम विजेता राफेल नदाल अमेरिकन ओपन टेनिसमध्ये गेल्या एका दशकात सर्वांत खराब कामगिरीसह शनिवारी स्पर्धेबाहेर पडला. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेली सेरेना विल्यम्स हिची मात्र विजयी घोडदौड सुरूच आहे.स्पेनचा १८वा मानांकित फेलिसियानो लोपेझ याने दहावा मानांकित मिलोस राओनिक याचा ६-२, ७-६, ६-३ ने पराभव केला.गत चॅम्पियन सेरेनाने चुकांपासून बोध घेऊन तणावपूर्ण लढतीत १०१व्या स्थानावरील आपलीच सहकारी बेथानी माटेक हिच्यावर ३-६, ७-५, ६-० असा विजय नोंदविला. त्याआधी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला नोवाक जोकोविच याने दहाव्या ग्रॅण्डस्लॅम जेतेपदाकडे झेप घेऊन इटलीचा आंद्रियास सेप्पी याचा ६-३, ७-५, ७-६ असा पराभव केला. यंदा तिसऱ्या जेतेपदाकडे आगेकूच करणाऱ्या जोकोविचचा इटलीच्या प्रतिस्पर्धी खेळाडूंविरुद्ध हा सलग ३०वा आणि सेप्पीविरुद्ध सलग ११वा विजय होता. गतविजेता क्रोएशियाचा मारिन सिलीच हा पराभूत होताना बचावला. पाच सेटपर्यंत रंगलेल्या थरारात ५६व्या स्थानावर असलेला कझाकिस्तानचा मिखाईल कुकुशकीन याने मारिनला ६-७, ७-६, ६-३, ६-७, ६-१ असे झुंजवले. सेरेनाची मोठी बहीण व्हीनसने १२वी मानांकित स्वित्झर्लंडची बेलिंडा बेनसिचप हिला सरळ सेटमध्ये ६-३, ६-४ असे नमविले. बेलिंडाने टोरोंटो येथे सेमी फायनलमध्ये सेरेनाला धूळ चारली होती; पण व्हीनसविरुद्ध चारपैकी एकही लढत तिला जिंकता आलेली नाही. पुरुष गटात फ्रान्सचा बेनोइट पेयरे याने स्पेनचा टावॅमी रॉब्रेडो याला ७-६, ६-१, ६-१ असा धक्का देऊन पहिल्यांदा चौथी फेरी गाठली. (वृत्तसंस्था)सेरेना विक्रमाच्या उंबरठ्यावर...‘सध्या सर्वच स्पर्धा जिंकणारी सेरेना १९८८मध्ये स्टेफी ग्राफनंतर कॅलेंडर स्लॅम पूर्ण करणारी पहिली खेळाडू बनण्याच्या स्थितीत आहे. त्यासाठी सेरेनाला आणखी ४ विजय नोंदवावे लागतील. पुढच्या फेरीत ती १९वी मानांकित अमेरिकेची मेडिसन कीज हिच्याविरुद्ध खेळेल. सेरेनाने जेतेपद पटकावल्यास हे तिचे २२वे एकेरी ग्रॅण्डस्लॅम असेल. शिवाय, सर्वाधिक ग्रॅण्डस्लॅम जिंकण्यात ती स्टेफीशी बरोबरी साधेल. सर्वाधिक २४ एकेरी ग्रॅण्डस्लॅम जिंकण्याचा सर्वकालीन विक्रम मार्गारेट कोर्ट हिच्या नावावर आहे.पेस दुहेरीत, सानिया मिश्रमध्ये पराभूतअमेरिकन ओपनमध्ये लिएंडर पेस आणि सानिया मिर्झा या दोघांना पराभवाचा सामना करावा लागला. सानियाचा मिश्र दुहेरीत तर लिएंडरचा पुरूष दुहेरीत पराभव झाला.सानिया आणि ब्रुनो सोरेस या गतविजेत्या जोडीला पहिल्या फेरीतच आंद्रिया हलावाकोवा आणि लकास कुबोट या चेक गणराज्याच्या जोडीने ३-६,३-६ ने पराभूत केले. त्या आधी पुरूष दुहेरीत लिएंडर पेस आणि फर्नांडो वर्दास्को या जोडीला पुरूष दुहेरीत दुसऱ्या फेरीत स्टिव्ह जॉन्सन आणइ सॅम क्वॅरी या बिगर मानांकित अमेरिकन जोडीने ५-७, ६-४, ३-६ असे पराभूत केले. महिला दुहेरीत सानिया आणि मार्टिना हिंगीसचा सामना स्वित्झरलंडची टिमिया बाकसिंसज्की व तैवानची चिया जुंग चुआगशी होणार आहे. नदालने पहिले दोन सेट ३-६, ४-६ गुणांनी जिंकले; पण त्यानंतरही सामना गमावला. ३२वा मानांकित इटलीचा फॅबियो फॉगनिनी याने त्याला ६-४, ६-३, ६-४ अशी धूळ चारली. २००५मध्ये अमेरिकेचा जेम्स ब्लॅक याच्याकडून तिसऱ्या फेरीत पराभूत झालेला नदाल या स्पर्धेतून त्यानंतर कधीही लवकर बाहेर पडला नव्हता. नदालने पहिले दोन सेट जिंकल्यानंतर सर्व म्हणजे १५१ सामने जिंकले होते.