ही माझी अखेरची आॅलिम्पिक स्पर्धा - विकास कृष्णन

By admin | Published: June 27, 2016 10:46 PM2016-06-27T22:46:04+5:302016-06-27T22:46:04+5:30

रिओ आॅलिम्पिक माझ्यासाठी अखेरची आॅलिम्पिक स्पर्धा असेल. मात्र यावेळी मी देशासाठी किमान कांस्य पदक नक्की पटकावेल, असा विश्वास बॉक्सर विकास कृष्णन याने व्यक्त केला.

This is my last event - Vikas Krishnan | ही माझी अखेरची आॅलिम्पिक स्पर्धा - विकास कृष्णन

ही माझी अखेरची आॅलिम्पिक स्पर्धा - विकास कृष्णन

Next

नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिक माझ्यासाठी अखेरची आॅलिम्पिक स्पर्धा असेल. मात्र यावेळी मी देशासाठी किमान कांस्य पदक नक्की पटकावेल, असा विश्वास बॉक्सर विकास कृष्णन याने व्यक्त केला.
कोच जगदीप हुड्डा यांच्यासह प्रसारमाध्यमांशी बोलताना विकासने सांगितले की, ‘‘यंदाची आॅलिम्पिक माझी अखेरची आॅलिम्पिक स्पर्धा असेल. या स्पर्धेनंतर माझ्या परिवारासह मला वेळ घालवायचा आहे. त्याचबरोबर देशात बॉक्सिंगच्या प्रगतीसाठीही काम करि इच्छितो.’’ २४ वर्षील विकासने नुकताच बाकु (अझरबैजान) येथे झालेल्या आॅलिम्पिक पात्रता स्पर्धेत कांस्य पटकावून रिओचे तिकिट निश्चित केले होते. उपांत्यपुर्व फेरीत डोळ्यांच्या वरच्या बाजूला दुखापत झाल्यानंतरही उपांत्य फेरी गाठलेल्या विकासने दिमाखात आॅलिम्पिक प्रवेश केला. मात्र दुखापतीमुळे तो या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत खेळू शकला नव्हता.
रिओ आॅलिम्पिकमध्ये ७५ किलो वजनीगटातील पदकाच्या अपेक्षाविषयी विकासने सांगितले, ‘‘मी देशासाठी पदक नक्की जिंकेल, इतकेच सध्या सांगू शकतो. तरीही, सर्वकाही मिळणाऱ्या ड्रॉवर अवलंबून आहे. तरीही किमान कांस्य पदकाची मला पुर्ण अपेक्षा आहे. यासाठी मला दोन फाइट जिंकाव्या लागतील.’’ त्याचवेळी कोच जगदीश यांनी मात्र, ‘‘विकासमध्ये सुवर्ण जिंकण्याची क्षमता असून, माहित नाही तो कांस्य पदकाबद्दल अपेक्षा ठेवून का आहे,’’ असे म्हटले.
विकासने पुढे सांगितले की, ‘‘लंडन आॅलिम्पिकवेळी माझे वय २० वर्ष होते आणि अनुभवही कमी होता. मात्र यावेळी मी अधिक अनुभवासह सहभागी होत आहे. मी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य मिळवले असून मोठ्या स्पर्धांचा मला अनुभव आहे. यामुळे गत आॅलिम्पिकच्या तुलनेत यावेळी माझा आत्मविश्वास खूप वाढला आहे.’’
त्याचप्रमाणे, ‘‘आगामी आॅलिम्पिकसाठी सध्या माझा कठोर सराव सुरु आहे. यावेळी पदक जिंकण्यात मी कोणतीही कमतरता ठेवणार नाही, असा विश्वास देतो. वयाच्या ११व्या वर्षापासून मी बॉक्सिंगला सुरुवात केल्यानंतर गेल्या १३-१४ वर्षांपासून खेळत आहे. यंदाची आॅलिम्पिक माझ्यासाठी अखेरची असल्याने मी या स्पर्धेत स्वप्नवत कामगिरी करण्यात उत्सुक आहे,’’ असेही विकासने यावेळी सांगितले. (वृत्तंस्था)

- लंडन आॅलिम्पिकमध्ये १३-११ अशा गुणांनी विजयी झाल्यानंतरही अमेरिकेच्या बॉक्सरने केलेल्या अपिलमुळे विकासला पराभवास सामोरे जावे लागले. या धक्कादायक प्रकाराने विकास इतका निराश झाला होता की, तब्बल दिड वर्षांपर्यंत तो बॉक्सिंगपासून दूर राहिला होता. मात्र बॉक्सिंगवरील प्रेमामुळे पुन्हा एकदा रिंगमद्ये उतरल्यानंतर २०१४ साली आशियाई स्पर्धेत कांस्य आणि २०१५ च्या आशियाई स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केली. सध्या विकास जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर विराजमान आहे.

...तर व्हेनेजुएला स्पर्धेत विकास उतरला असता
जर, बाकू स्पर्धेत आॅलिम्पिक तिकिट मिळवण्यात अपयश आले असते, तर विकास व्हेनेजुएला येथे होणाऱ्या स्पर्धेत खेळला असता. याआधी आयबा प्रो नाइट खेळलेल्या विकासला या स्पर्धेसाठी निमंत्रणही मिळाले होते. मात्र नियमांप्रमाणे तो ही स्पर्धा खेळू शकत नव्हता. मात्र त्याचवेळी आपला सराव अधिक मजबूत करण्यासाठी विकास प्रो बॉक्सर्सविरुध्द खेळण्याची शक्यता आहे.

प्रोफेशनल आणि हौशी यापैकी कोणत्या बॉक्सिंगला पसंती देशील यावर विकास म्हणाला, ‘‘सध्या यावर निर्णय देणे माझ्यासाठी कठीण आहे. माझे लक्ष्य भारतीय बॉक्सिंगला यशाच्या शिखरावर नेण्याचे आहे. आॅलिम्पिकनंतर मी हेच लक्ष्य साधण्याचा प्रयत्न करणार आहे.’’

गतआॅलिम्पिकमध्ये भारताच्या आठ बॉक्सर्सनी पात्रता मिळवली होती, तर यंदा हीच संख्या केवळ तीन आहे. गतवेळची पदकविजेती मेरी कोमही यंदाच्या आॅलिम्पिकमध्ये प्रवेश करु शकली नाही. शिवाय या ओलिम्पिकमध्ये जर भारतीय बॉक्सर्सना आयबाच्या ध्वजाखाली खेळावे लागले, तर त्यांच्यामध्ये तो जोश नसेल जो तिरंग्याखाली खेळताना असेल. मात्र, तरीही जर त्यांनी पदक जिंकले तर ते देशाचे पदक असेल आणि यासाठी बॉक्सर्स जीव तोडून प्रयत्न करतील.
- विकास कृष्णन

Web Title: This is my last event - Vikas Krishnan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.