शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

 अभिमानास्पद! मुरली श्रीशंकरने जिंकले रौप्य पदक; भारतीय शिलेदार पॅरिस ऑलिम्पिकसाठी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2023 15:10 IST

murali sreeshankar world athletics : मुरली श्रीशंकर पॅरिस २०२४ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. 

Asian Athletics Championships : भारतीय ॲथलीट लांब उडीपटू मुरली श्रीशंकरने बँकॉक, थायलंड येथे सुरू असलेल्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२३ मध्ये मोठे यश मिळवले आहे.  श्रीशंकरने पुरुषांच्या लांब उडी प्रकारात ८.३७ मीटरच्या प्रयत्नात रौप्य पदक जिंकून तिरंग्याची शान वाढवली. लक्षणीय बाब म्हणजे या कामगिरीसह तो पॅरिस ऑलिम्पिक २०२४ साठी पात्र ठरला आहे. 

आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकल्यानंतर २०२४ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा तो पहिला भारतीय ट्रॅक आणि फील्ड ॲथलीट ठरला. पॅरिसमध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी लांब उडीचे अंतर ८.२७ मीटर आहे. खरं तर चायनीज खेळाडूने चौथ्या फेरीत ८.४० मीटर उडी मारून सुवर्णपदक जिंकले, जो या हंगामातील जगातील तिसरा सर्वोत्तम प्रयत्न आहे. 

भारताच्या रिले संघाने जिंकले सुवर्ण दरम्यान, राजेश रमेश, ऐश्वर्या कैलाश मिश्रा, अमोज जेकब आणि सुभा वेंकटेशन यांच्या भारतीय मिश्र ४×४०० मीटर रिले संघाने भारताला सुवर्णपदक जिंकून दिले. यासोबतच त्यांनी एक नवा राष्ट्रीय विक्रम देखील नोंदवला. भारतीय ॲथलीट अनिल सर्वेश कुशारे आणि स्वप्ना बर्मन यांनी आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२३ च्या चौथ्या दिवशी अनुक्रमे पुरुषांच्या उंच उडी आणि महिलांच्या हेप्टॅथलॉन स्पर्धेत रौप्य पदके जिंकली. 

भारताच्या खात्यात पाच पदकेशनिवारी भारताच्या खात्यात पाच पदके आली. यामध्ये एक सुवर्ण, तीन रौप्य आणि एका कांस्य पदकाचा समावेश होता. आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२३ मधील भारताची एकूण पदक संख्या सध्या १४ एवढी झाली आहे. यामध्ये सहा सुवर्ण, चार रौप्य आणि चार कांस्य पदकांचा समावेश आहे.

टॅग्स :IndiaभारतhistoryइतिहासParisपॅरिसSilverचांदी