शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
4
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
5
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
6
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
7
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
8
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
9
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
10
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
11
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
12
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
13
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
14
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
15
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
16
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
17
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
18
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
19
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
20
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल

मुरली, रहाणेने सांभाळले

By admin | Updated: December 18, 2014 05:14 IST

मुरली विजय (१४४) आणि अजिंक्य रहाणेच्या (७५*) धावांच्या बळावर भारताने बुधवारपासून सुरु झालेल्या आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या

ब्रिस्बेन : मुरली विजय (१४४) आणि अजिंक्य रहाणेच्या (७५*) धावांच्या बळावर भारताने बुधवारपासून सुरु झालेल्या आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत सुरुवातीच्या झटक्यांपासून स्वत:ला सावरले. भारताने दिवसअखेर ४ विकेट्सच्या मोबदल्यात ३११ धावांचा समाधानकारक पल्ला गाठला. दुखापतीतून सावरून कमबॅक करणाऱ्या कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि चहापानापर्यंत ३ बाद १५१ धावा अशा दयनीय अवस्थेत संघ सापडला. भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ८३ षटकांत चार बाद ३११ धावा बनविल्या. अजिंक्य रहाणे ७५ धावांवर, तर रोहित शर्मा २६ धावांवर खेळत आहे.सलामीवीर मुरलीने भारताच्या डावाला आकार दिला आणि आपल्या कसोटी कारकिर्दीतले पाचवे शतक पूर्ण केले. मुरलीने २१३ चेंडूंत २२ चौकार लगावून १४४ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. मुरलीने रहाणेसह चौथ्या विकेटसाठी १२४ धावांची मजबूत भागीदारी करून संघाला तीनशेचा पल्ला पार करून दिला. मुरलीचा आॅस्ट्रेलियाविरुद्ध हा चौथे कसोटी शतक आहे. याचबरोबर त्याने कसोटीत आपले २००० धावा पूर्ण केल्या. याआधी रहाणेने सहावा अर्धशतक पूर्ण केले. अ‍ॅडिलेड कसोटीत सामनावीराचा किताब पटकावणाऱ्या नॅथन लिआॅनने मुरलीला ब्रॅड हॅडिनकरवी झेलबाद करून माघारी धाडले. मुरली बाद झाल्यानंतर सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रोहितने ३४ चेंडूंत दोन चौकार व एक षटकार खेचून नाबाद २६ धावा केल्या. तत्पूर्वी गॅबाच्या उसळी घेणाऱ्या खेळपट्टीवर भारताची सुरुवात निराशाजनक झाली. भारताला या खेळपट्टीवर एकही कसोटी विजय मिळवता आलेला नाही. शिखर धवन पुन्हा फ्लॉप ठरला. ३९ चेंडूंत २४ धावा करणाऱ्या धवनला मिशेल मार्शने हॅडिनकरवी झेलबाद केले. धावफलकावर ५६ धावा असताना धवन माघारी परतला. त्यानंतर चेतेश्वर पुजारा १८ धावांवर पहिलीच कसोटी खेळणाऱ्या जोश हेजलवुडच्या गोलंदाजीवर माघारी परतला.