शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

मुंबईने दिली पुण्याला ‘टपली’

By admin | Updated: July 21, 2015 23:47 IST

बलाढ्य यू मुंबा संघाने अपेक्षेप्रमाणे दबदबा राखताना पुणेरी पलटणचा २८-२१ असा सहज पराभव करून घरच्या मैदानावर सलग चौथा

रोहित नाईक, मुंबईबलाढ्य यू मुंबा संघाने अपेक्षेप्रमाणे दबदबा राखताना पुणेरी पलटणचा २८-२१ असा सहज पराभव करून घरच्या मैदानावर सलग चौथा विजय मिळवला. या वेळी रिशांक देवाडिगाने संपूर्ण सामन्यात अष्टपैलू खेळ केला, तर हुकमी शब्बीर बापूनेदेखील दमदार आक्रमण करून यू मुंबाची विजयी घोडदौड कायम राखली. विशेष म्हणजे गतस्पर्धेतील अंतिम सामना सोडल्यास यू मुंबाची घरच्या मैदानावर आतापर्यंत विजयी कामगिरी राहिली आहे. या विजयासह यू मुंबाने २० गुणांसह अग्रस्थान आणखी मजबूत केले.वरळी येथील एनएससीआय स्टेडियममध्ये प्रेक्षकांचा पूर्ण पाठिंबा यू मुंबाला मिळाला. रिशांक, शब्बीर आणि कर्णधार अनुप कुमारच्या प्रत्येक चढाईवर प्रेक्षकांनी मोठा जल्लोष केला. सुरुवातीला दोन्ही संघांकडून चुरशीचा खेळ झाला. पुणे संघ पुन्हा एकदा कर्णधार वझीर सिंगवर अवलंबून असल्याचे दिसले. वझीरने १५ पैकी ४ यशस्वी चढाया केली. एका बोनस गुणासह त्याने पुण्याकडून सर्वाधिक ७ गुण कमावले. याव्यतिरीक्त महिपाल नरवालने आक्रमणात ४ तर तर विजेंदर सिंगने भक्कम बचावामध्ये २ गुण घेऊन चमक दाखवली.दुसऱ्या बाजूला यू मुंबाच्या खेळाडूंनी आपला हिसका दाखवताना मध्यंतरानंतर पुण्याला लोळवले. पहिल्या सत्रात पुणेरी पलटणने झुंजार खेळ केल्याने मुंबाला मध्यंतराला १०-९ अशा एका गुणाच्या आघाडीवर समाधान मानावे लागले. यानंतर मात्र मुंबईकरांनी आक्रमक पवित्रा घेतला. दरम्यान, पुणे संघाला मुंबईकरांवर लोण चढवण्याची नामी संधी होती. मात्र, आक्रमणात आत्मविश्वास दिसून येत नसल्याने वारंवार ही संधी हुकत होती. अखेर ३०व्या मिनिटाला प्रवीण निवालेले एकाच चढाईमध्ये शब्बीर व भूपेंदर सिंगला बाद करून पुण्याची पिछाडी १७-१८ अशी कमी केली.यानंतर, वेळेची कमतरता पाहून मुंबईकरांनी ‘टाईमपास’ टाळला आणि सलग गुणांचा धडाका लावत पुण्यावर जबरदस्त दबाव टाकला. शेवटच्या काही मिनिटांत आघाडीवर असताना मुंबईने ३९व्या मिनिटाला लोण चढवून पुणेरी पलटणची हवा काढली. अखेरच्या मिनिटाला अनुपने आरामात चढाई करून वेळ घालवला आणि मुंबईने २८-२१ अशी सहज बाजी मारली.