शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

मुंबईची अडखळती सुरुवात; ४ बाद १७१

By admin | Updated: January 3, 2017 00:36 IST

तमिळनाडूचा पहिला डाव मर्यादित धावसंख्येत रोखल्यानंतर आघाडीच्या फलंदाजांनी मोक्याच्या वेळी कच खल्ल्याने मुंबईची रणजी चषक उपांत्य सामन्यात दुसऱ्या दिवसअखेर ४ बाद १७१ धावा अशी अवस्था झाली.

राजकोट : तमिळनाडूचा पहिला डाव मर्यादित धावसंख्येत रोखल्यानंतर आघाडीच्या फलंदाजांनी मोक्याच्या वेळी कच खल्ल्याने मुंबईची रणजी चषक उपांत्य सामन्यात दुसऱ्या दिवसअखेर ४ बाद १७१ धावा अशी अवस्था झाली. शार्दुल ठाकूर आणि अभिषेक नायर यांच्या अचूक माऱ्यापुढे तमिळनाडूचा पहिला डाव ३०५ धावांमध्ये संपुष्टात आला.

सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात तमिळनाडूने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आश्वासक सुरुवात केलेल्या तमिळनाडूला शार्दुल आणि नायर यांनी मोक्याच्यावेळी झटके देत त्यांचा डाव मर्यादित रोखला. बाबा इंद्रजित (६४), कौशिक गांधी (५०) व विजय शंकर (५०) यांनी संघाला सावरले.मुंबईने डावाची सुरुवात केली तेव्हा सर्वांची नजर युवा सलामीवीर पृथ्वी शॉकडे होती. एक चौकार मारून पृथ्वीने सर्वांची उत्सुकता वाढवली देखील, मात्र नंतर अश्विन क्रिस्टच्या गोलंदाजीवर पहिल्याच षटकात तो यष्टिरक्षकाकडे झेल देऊन परतला. पहिल्याच षटकात धक्का बसल्यानंतर मुंबईकरांनी सावध पवित्रा घेतला.

यावेळी तमिळनाडू पकड मिळविणार असे दिसत होते, परंतु प्रफुल वाघेला आणि सूर्यकुमार यादव यांनी दुसऱ्या विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी करून मुंबईला चांगल्या स्थितीत आणले. विजय शंकरने सूर्यकुमारला बाद करून ४३व्या षटकात ही जोडी फोडली. त्याने ११६ चेंडूंत ११ चौकारांसह १ षट्कार ठोकून ७३ धावा केल्या. ४४व्या षटकात वाघेला १३४ चेंडंूत ८ चौकारांसह ४८ धावा काढून धावबाद झाला, तर याच षटकातील अखेरच्या चेंडूवर सिद्धेश लाड भोपळाही न फोडता औशिक श्रीनिवासचा शिकार ठरला.

झटपट ३ बळी गेल्याने मुंबईचा डाव १ बाद १२५ वरून ४ बाद १२८ असा घसरला. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा कर्णधार आदित्य तरे (१९*) व भरवशाचा श्रेयश अय्यर (२४*) खेळत होते. तमिळनाडूकडून अश्विन क्रिस्ट, औशिक श्रीनिवास आणि गंगा श्रीधर राजू यांनी प्रत्येकी एक बळी घेतले.तत्पूर्वी, ६ बाद २६१ धावांवरून पुढे खेळताना तमिळनाडूचा डाव ३०५ धावांत संपुष्टात आला. शार्दुल ठाकूर (४/७५) आणि अभिषेक नायर (४/६६) यांनी अचूक मारा केला. विजय शंकर आपल्या वैयक्तिक धावसंख्येत ९ धावांची भर काढून अर्धशतक झळकावून बाद झाला. यानंतर अश्विन क्रिस्टने (३१) काहीवेळ प्रतिकार केल्याने तामिळनाडूला तीनशेचा टप्पा पार करता आला. संक्षिप्त धावफलकतमिळनाडू (पहिला डाव) : ११५.२ षटकांत सर्वबाद ३०५ धावा (बाबा इंद्रजित ६४, विजय शंकर ५०, कौशिक गांधी ५०; अभिषेक नायर ४/६६, शार्दुल ठाकूर ४/७५) मुंबई (पहिला डाव) : ६० षटकांत ४ बाद १७१ धावा (सूर्यकुमार यादव ७३, प्रफुल वाघेला ४८, आदित्य तरे खेळत आहे १९, श्रेयश अय्यर खेळत आहे २४; विजय शंकर १/१४, औशिक श्रीनिवास १/२२)