शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

प्रो कबड्डीत मुंबईचा 'जय हो', मुंबईकरांनी काढली यूपी योद्धांची हवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 06:51 IST

प्रो कबड्डी ; पिछाडीवरुन पुनरागमन करत यू मुंबाने मारली ४१-२४ अशी बाजी

मुंबई : सुरुवातीला संथ खेळ केलेल्या यू मुंबाने दुसऱ्या सत्रात जबरदस्त आक्रमक खेळ करत प्रो कबड्डी लीगच्या इंटरझोन लढतीत यूपीयोद्धा संघाचा ४१-२४ असा धुव्वा उडवला. या शानदार विजयासह मुंबईकरांनी ‘अ’ गटात ४६ गुणांची कमाई करत आपले अव्वल स्थान अधिक भक्कम केले. अन्य लढतीत पुणेरी पलटनला तेलगू टायटन्सविरुद्ध २५-२८ असा निसटता पराभव पत्करावा लागला.

वरळी येथील एनएससीआय डोम स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात मुंबईने संथ सुरुवात केली. यूपी योद्धाने यावेळी काहीसा वेगवान खेळ करत सामन्यावर वर्चस्व मिळवण्याचा चांगला प्रयत्न केला. परंतु, मुंबईकरांनी मध्यंतराला १५-१४ अशी नाममात्र आघाडी घेतली.दुसºया सत्रात मात्र यू मुंबाने यूपी योद्धा संघाला आपला हिसका दाखवला. पिछाडीवरुन पुनरागमन करण्यात माहीर असलेल्या मुंबईकरांनी जबरदस्त आक्रमण करत योद्धांच्या खेळातील हवाच काढली. सिद्धार्थ देसाई, सुरेंदर सिंग आणि दर्शन कडियन यांनी प्रत्येकी ७ गुण मिळवले. हुकमी संरक्षक फझल अत्राचली याने ६ गुण मिळवत योद्धाचे आक्रमण खिळखिळे केले. यूपी योद्धांकडून नरेंदर आणि सचिन यांनी प्रत्येकी ५ गुण घेत अपयशी झुंज दिली. यूपीचा स्टार आणि मुळचा मुंबईकर रिशांक देवाडिगाही यावेळी अपयशी ठरला.तत्पूर्वी अन्य सामन्यात तेलगू टायटन्सने दबावाच्या क्षणी शांत खेळ करताना पुणेरी पलटणचा २८-२५ असा पराभव केला.पुणेकरांनी जबरदस्त पुनरागमन करताना अखेरच्या काही मिनिटांत १० गुणांची पिछाडी २ गुणांपर्यंत आणली, पण अखेर तेलगूकडील आघाडी निर्णायक ठरली. 

टॅग्स :Pro-Kabaddiप्रो-कबड्डीMumbaiमुंबई