शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
2
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
3
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
4
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
5
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
6
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
7
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
8
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
9
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
10
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
11
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
12
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
13
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
14
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
15
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
16
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! 'या' कंपनीशी कुठलाही व्यवहार करू नका; अन्यथा पश्चाताप होईल, सेबीचा इशारा!
18
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
19
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
20
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा

मुंबईचा ‘डबल धमाका’ टीम इंडियासाठी सज्ज

By admin | Updated: December 29, 2015 01:17 IST

मुंबई शालेय क्रिकेटमध्ये सध्या रिझवी स्प्रिंगफिंगल्ड संघाचे एकहाती वर्चस्व आहे. स्पर्धा कोणतीही असो, अंतिम सामन्यात रिझवीचा संघ असणारच हे निश्चित असते. याच संघातील

मुंबई : मुंबई शालेय क्रिकेटमध्ये सध्या रिझवी स्प्रिंगफिंगल्ड संघाचे एकहाती वर्चस्व आहे. स्पर्धा कोणतीही असो, अंतिम सामन्यात रिझवीचा संघ असणारच हे निश्चित असते. याच संघातील दोन फलंदाजांनी मुंबई क्रिकेटवर अक्षरश: दबदबा राखला आणि आज हेच दोन फलंदाज १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करण्यास सज्ज झाले आहेत. हे दोन फलंदाज आहेत, सर्फराज खान आणि अरमान जाफर.यंदा झालेल्या आयपीएलच्या आठव्या पर्वात रॉयल चँलेंजर्स बंगळुरु कडून खेळताना युवा सर्फराजने साऱ्या क्रिकेट जगताचे लक्ष वेधून घेतले, तर देशांतर्गत क्रिकेटमधील दिग्गज फलंदाज वासिम जाफर याचा पुतण्या अरमान जाफरने आपल्या तंत्रशुध्द फलंदाजीने स्वत:ची ‘रनमशीन’ म्हणून ओळख निर्माण केली. सोमवारी वांद्रेच्या रिझवी स्प्रिंगफिल्ड शाळेने आपल्या या दोन्ही शिष्यांचा सत्कार करून, त्यांना आगामी १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड याचे मार्गदर्शन मिळत असलेला सर्फराज म्हणाला की, ‘राहुलसरांकडून खूप शिकलो. ते संयमी खेळीसाठी ओळखले जातात, तर मी आक्रमक खेळीला प्राधन्य देतो, परंतु त्यांनी मला कधीही रोखले नाही. आक्रमणापासून थांबू नको, पण ५० षटके टिकल्यास विजय निश्चित आपला आहे, याची जाणीव त्यांनी करून दिली.’ दुसरीकडे अरमान पहिल्यांदाच ब्ल्यू जर्सी परिधान करण्यास सज्ज आहे. मोठ्या कालावधीनंतर पुन्हा एकदा सर्फराझसह एकाच संघातून खेळण्याची संधी मिळणार असल्याबद्दल तो म्हणाला, ‘आमच्यातील ताळमेळ खूप उत्तम असून, शालेय क्रिकेटमधील अनुभवाचा आम्हाला फायदा होईल.’ गेलने दिला विश्वास...आयपीएलमध्ये आरसीबी संघातून खेळताना धडाकेबाज ख्रिस गेलकडून महत्त्वाचा संदेश मिळाल्याचे सर्फराज म्हणतो. गेलचे माझ्यावर विशेष प्रेम आहे. कधीही अपयशी झाल्यास नाराज न होता, पुन्हा एकदा त्याहून चांगली कामगिरी करण्यास सज्ज व्हावे, असा संदेश गेलने दिला असल्याचे सर्फराजने सांगितले.सर्फराज खूप आक्रमक फलंदाज आहे. तो स्वीपचा फटका मारण्यात तरबेज आहे. कोणत्याही गोलंदाजाला स्वीप मारून त्याची लय बिघवडण्यात सर्फराज तरबेज आहे. ज्यावेळी तो पूर्ण जोशमध्ये असतो, तेव्हा नॉन स्ट्राइकला उभे राहून त्याची फलंदाजी बघण्यासारखी असते.- अरमान जाफरअरमानच्या फलंदाजीतील संयम आवडतो. तो खेळपट्टीवर टिकून राहतो. त्याच्यातील थोडासा संयम जरी माझ्याकडे आला, तर माझी फलंदाजी आणखी बहरू शकते. त्याला टीम इंडियात पाहणे खूप आनंददायक आहे. आमच्यातील ताळमेळ उत्तम असल्याने प्रतिकूल परिस्थितीत तो माझ्यासह फलंदाजीला असल्यास दडपण नसेल.- सर्फराज खान