शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

मुंबईच्या महिलांनी मारली बाजी, राज्य कॅरम स्पर्धेत पुणे संघाला नमवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 05:25 IST

महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या (एमसीए) वतीने जुन्या विवा महाविद्यालयात सुरू असलेल्या या स्पर्धेत कर्णधार काजल कुमारीने पुण्याच्या मेधा मठकरीला १७-१६, २५-६ असे सहज नमवले.

मुंबई : मुंबईच्या महिला संघाने आपल्या लौकिकानुसार खेळ करत पुणे संघाचे कडवे आव्हान ३-० असे सहज परतावले. यासह मुंबईकरांनी ५६व्या वरिष्ठ महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत सांघिक महिला गटाचे जेतेपद पटकावताना भास्कर वामन ठाकूर चषक उंचावला. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या (एमसीए) वतीने जुन्या विवा महाविद्यालयात सुरू असलेल्या या स्पर्धेत कर्णधार काजल कुमारीने पुण्याच्या मेधा मठकरीला १७-१६, २५-६ असे सहज नमवले. अंबिका हरिथने पुष्कर्णी भट्टडचा २५-११, २५-१२ असा पराभव केल्यानंतर दुहेरीत अनुपमा केदार-मिताली पाठक यांनी पूजा मेश्राम-श्रुती वेळेकर यांना १५-१९, २५-११, १७-१० असे नमवत मुंबईचे जेतेपद निश्चित केले.

सिंधुदुर्गने ठाण्याला २-१ असे नमवत तिसरे स्थान पटकावले. ठाण्याच्या समृद्धी घाडीगावकरने केशर निर्गुणला १९-१२, २५-६ असे नमवले. यानंतर सिंधुदुर्गने पुनरागमन केले. दीक्षा चव्हाणने चैताली सुवारेला, तर मयुरी गावडे-प्रणिता आयरे यांनी मधुरा देवळे-वीणा चव्हाण यांना नमवत सिंधुदुर्गला विजयी केले.

टॅग्स :Mumbaiमुंबई