शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

मुंबई पोलिसांचा ‘दबदबा’ कायम

By admin | Updated: March 7, 2015 01:12 IST

मुंबई- नायगाव येथे बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या २७व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत मुंबई पोलिसांनी आपले वर्चस्व कायम राखले.

रमेश प्रभू ल्ल मुंबईमुंबई- नायगाव येथे बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या २७व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत मुंबई पोलिसांनी आपले वर्चस्व कायम राखले. १९८२ सालापासून सुरू झालेल्या या स्पर्धेत मुंबई पोलिसांनी सलग चौथ्यांदा विजेतेपद मिळवताना तब्बल दहाव्यांदा अजिंक्यपद पटकावले. मुंबई पोलिसांनी आपला दबदबा राखताना मागील सर्व स्पर्धांतील गुणांचे विक्रम मोडताना १५२ गुणांसह एकूण १० सुवर्णपदकांची लयलूट केली.हॉलीबॉल, जलतरण, वेटलिफ्टिंग, कबड्डी, खो-खो, बास्केटबॉल, कुस्ती, ज्युडो आणि बॉक्सिंगमध्ये मुंबई पोलीस वरचढ राहिले. तर हॉकी, फुटबॉल, हँडबॉल व अ‍ॅथलेटीक्समध्ये कामगिरीत सुधारणा झाली. कबड्डीमध्ये महिला संघाने सुवर्ण तर पुरुषांना रौप्यवर समाधान मानावे लागले. तसेच खो-खो खेळाचा या स्पर्धेत २०१२ साली समावेश झाल्यापासून मुंबई पोलिसांनी आपले अव्वल स्थान सोडले नाही. बास्केटबॉलमध्ये खुद्द पोलीस आयुक्त राकेश मारिया मैदानात उतरले आणि मुंबईने कोल्हापूरला नमवून सुवर्ण पटकावले. जलतरणमध्ये गणेश पालांडेने अनेक विक्रमांसह आपले वर्चस्व राखले. वेटलिफ्टिंगमध्येदेखील मुंबई पोलिसांनी आपली छाप पाडली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयुक्त मारिया यांच्या नेतृत्वाखालील स्पर्धा समिती गेले ३ महिने नियोजनबद्ध काम करीत होती. शिवाय मुंबई पोलिसांच्या खेळाडूंना विशेष आहाराची व्यवस्थादेखील दोन महिने पोलीस आयुक्तालयाच्या वतीने करण्यात आली होती; आणि त्याला उत्तम प्रतिसाद म्हणून खेळाडूंनीदेखील अथक परिश्रम घेत बाजी मारली.