शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

मुंबई मॅरेथॉन : पदक जिंकूनही भारतीय धावपटू झाले नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 05:54 IST

Mumbai Marathon: मॅरेथॉन स्पर्धेत शारीरिक क्षमतेसोबतच हवामानाचीही निर्णायक भूमिका असते. रविवारी पार पडलेल्या २०व्या मुंबई मॅरेथॉनमध्ये याच हवामानामुळे धावपटूंना अडचणीचा सामना करावा लागला.

- राेहित नाईकमुंबई - मॅरेथॉन स्पर्धेत शारीरिक क्षमतेसोबतच हवामानाचीही निर्णायक भूमिका असते. रविवारी पार पडलेल्या २०व्या मुंबई मॅरेथॉनमध्ये याच हवामानामुळे धावपटूंना अडचणीचा सामना करावा लागला. यामुळेच आघाडीच्या भारतीय धावपटूंनी पदक जिंकल्यानंतरही आपली नाराजी व्यक्त करताना पूर्ण मॅरेथॉन पहाटेच्या वेळी सुरू करण्यात यावी, असे मत व्यक्त केले. दरम्यान, पुरुष एलिट मॅरेथॉनमध्ये इरिट्रीयाच्या धावपटूंनी सुवर्ण व रौप्य पदक पटकावले. महिलांमध्ये केनिया, बहरेन आणि इथिओपिया येथील धावपटूंनी बाजी मारली.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत गारठा होता. मात्र, रविवारी गारवा कमी झाल्याने भारतीय धावपटूंनी ४२ किमी अंतराची पूर्ण मॅरेथॉन सकाळी ७:२० ऐवजी पहाटे ५:३० वाजता सुरू करण्याची मागणी केली. एलिट गटात इरिट्रीयाच्या बेरहाने टेस्फे याने २ तास ११.४४ मिनिटांची वेळ देत सुवर्ण जिंकले. त्याच्याच देशबांधव मेरहावी केसेटे याने २ तास ११.५० मिनिटांची वेळ देत रौप्य जिंकले. इथियोपियाच्या टेस्फेये डेमेके (२:११.५६) याने कांस्य पदकावर समाधान मानले. महिलांमध्ये, जॉयस टेले (केनिया) हिने २ तास २४.५६ मिनिटांची वेळ देत सुवर्ण पटकावले. शिताये इशेते (बहारेन २:२५.२९) हिने रौप्य, तर मेडिना अर्मिनो (इथिओपिया २:२७.५८) हिने कांस्य जिंकले.

लेह लडाखचा झेंडाअर्ध मॅरेथॉनमध्ये महिला गटात पहिल्या तिन्ही स्थानांवर लेह लडाखच्या धावपटूंनी कब्जा केला. यामध्ये स्टॅनझिन डोलकर (१:२५.५१), स्कारमा लांजेस (१:२७.०३) आणि टाशी लडोल (१:२९.३०) यांनी दबदबा राखला. पुरुषांमध्ये सावन बरवाल (१:०४.३७), हरमनजोत सिंग (१:०६.०३) आणि कार्तिक करकेरा (१:०७.२०) यांनी अनुक्रमे सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पटकावले. 

५:३० वाजता सुरु करा मॅरेथॉनभारतीय पूर्ण मॅरेथॉनमध्ये सेनादलाचा दबदबा कायम राहिला. अनिश थापा (२:१७.२३), मान सिंग (२:१७.३७) आणि गोपी थोनाकल (२:१९.५९) यांनी अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्य जिंकले.महाराष्ट्राच्या कालिदास हिरवेला (२:२०.२८) अवघ्या २९ सेकंदांनी चौथ्या स्थानी समाधान मानावे लागले. यावेळी, ऑलिम्पियन धावपटू गोपी याने मॅरेथॉन सुरू होण्याच्या वेळेबाबत नाराजी व्यक्त केली. त्याने म्हटले की, ‘मुंबई मॅरेथॉन खूप मोठी स्पर्धा आहे. येथे मॅरेथॉन सुरू होण्याच्या वेळेत बदल केला पाहिजे. आमची मॅरेथॉन जेव्हा सुरू होते, तेव्हा वातावरण काहीसे गरम होते. त्यामुळे आम्हाला वेळेत सुधारणा करणे कठीण होते. आमची पूर्ण मॅरेथॉन पहाटे किमान ५:३० वाजता सुरू व्हावी. यासाठी हौशी धावपटूंची शर्यत आमच्यानंतर करावी. याचा आम्हाला नक्कीच फायदा होईल.’ महिलांमध्ये निरमाबेन ठाकोर, सोनिका परमार आणि सोनम यांनी अनुक्रमे पहिले तीन स्थान पटकावले. या तिघींनीही स्पर्धेच्या वेळेबाबत नाराजी व्यक्त करताना मॅरेथॉन लवकर सुरू करण्याबाबत मत मांडले.

मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बाल सिंग चहल यांनी सलग २०व्या वर्षी मुंबई मॅरेथॉनमध्ये अर्ध मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण केली. २००४ सालापासून सुरू झालेल्या मुंबई मॅरेथॉनमध्ये त्यांनी यंदा २ तास २० मिनिटांची वेळ देत २१ किमी अंतराची अर्ध मॅरेथॉन पूर्ण केली.  

 

टॅग्स :Mumbai Marathonमुंबई मॅरेथॉन