शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

Mumbai Marathon 2019 : केनियाच्या कॉसमस लॅगटने पटकावले मुंबई मॅरेथॉनचे विजेतेपद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 12:04 IST

मुंबई  मॅरेथॉनमध्ये यंदाही अपेक्षेप्रमाणे आफ्रिकन धावपटूंचे वर्चस्व राहिले. परूषांमध्ये केनियाच्या कॉलमस लॅगट याने, तर महिलांमध्ये इथियोपियाच्या वॉर्कनेश अलेमू हिने बाजी मारली.

ठळक मुद्देकेनियाच्या कॉसमन लॅगटने पटकावले मुंबई मॅरेथॉनचे विजेतेपदमहिला गटात इथियोपियाची अलेमू विजेतीपूर्ण मॅरेथॉनच्या भारतीय गटात आर्मीच्या नितेंद्र सिंग रावत याने बाजी मारली

- रोहित नाईक मुंबई - मुंबई  मॅरेथॉनमध्ये यंदाही अपेक्षेप्रमाणे आफ्रिकन धावपटूंचे वर्चस्व राहिले. पुरूषांमध्ये केनियाच्या कॉलमस लॅगट याने, तर महिलांमध्ये इथियोपियाच्या वॉर्कनेश अलेमू हिने बाजी मारली. त्याचवेळी भारतीयांमध्ये नितेंद्रसिंग रावत आणि सुधा सिंग यांनी अनुक्रमे पुरूष व महिला गटात वर्चस्व राखले. 

यंदा अव्वल दहामध्ये एकाही भारतीय धावपटूंना स्थान मिळवता न आल्याने भारताची निराशा झाली. मुख्य मॅरेथॉनच्या पुरूष गटात केनियाच्या कॉसमस याने इथियोपियाच्या धावपटूंचे वर्चस्व मोडताना २:०९:१५ अशी बाजी मारली. आयच्यू बॅनटाय (२:१०:०५) आणि सुमेत अकलन्यू (२:१०:१४) या इथियोपियाच्या धावपटूंना अनुक्रमे रौप्य व कांस्य पटकावले. 

महिलांमध्ये इथियोपियाच्या धावपटूंचा दबदबा राहिला. वॉर्कनेश अलेमू हिने अनपेक्षित निकाल नोंदवत गतविजेती अमाने गोबेना हिला मागे टाकले. अलेमूने २:२५:४५ अशी वेळ नोंदवून बाजी मारली.   अलेमूच्या धडाक्यापुढे गतविजेत्या गोबेना हिला २:२६:०९ अशा वेळेसह रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. इथियोपियाच्याच बिर्के देबेले हिने २:२६:३९ वेळेसह कांस्य जिंकले. त्याचवेळी एकूण क्रमवारीत भारताच्या सुधा सिंगने ८वे स्थान पटकावले. 

भारतीय महिला गटात मध्य रेल्वेच्या सुधा सिंगने अपेक्षित वर्चस्व राखले. तिने वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करताना २:३४:५६ अशी वेळ दिली. सुधा सिंगने या कामगिरीसह जागतिक  अजिंक्यपद स्पधेसाठी पात्रताही  मिळवली. यासोबतच तिने मुंबई  मॅरेथॉनचा जुना विक्रमही मोडीत काढला. महाराष्ट्रची ज्योती गवते २:४५:४८ वेळेसह दुसऱ्या स्थानी आली, तर जिगमेट डोलमानने ३:१०:४३ वेळेसह तिसरे स्थान मिळवले.

भारतीय पुरुषांमध्ये नितेंद्रसिंग रावत याने बाजी मारताना गतविजेत्या गोपी थोनकल याचे आव्हान परतावले. नितेंद्रसिंग याने २:१५:५२ अशी वेळ नोंदवून सुवर्ण यश मिळविले. गतविजेत्या गोपीला २:१७:०३ वेळेसह रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. करण सिंग याने २:२०:१० अशी वेळ देत कांस्य जिंकले.

टॅग्स :Mumbai Marathonमुंबई मॅरेथॉनMumbaiमुंबई