शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
2
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
3
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
4
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
5
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
6
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
7
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
8
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
9
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
10
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
11
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
12
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
13
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
14
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
15
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
16
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
17
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
18
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!
19
जीएसटी कपातीमुळे कुटुंबाच्या मासिक खर्चात होणार बचत; पण वाचलेल्या पैशांची कुठे, कशी गुंतवणूक कराल?
20
रश्मिका मंदानाने घातली डायमंड रिंग, विजय देवरकोंडाशी झाला साखरपुडा? चर्चांना उधाण

मुंबई इंडियन्सची पुन्हा शरणागती

By admin | Updated: April 19, 2016 03:35 IST

सलामीवीर व कर्णधार डेव्हीड वॉर्नरच्या तडाखेबंद नाबाद ९० धावांच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील आपला पहिला विजय नोंदवून गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा ७ विकेट्सने धुव्वा उडवला

हैदराबाद : सलामीवीर व कर्णधार डेव्हीड वॉर्नरच्या तडाखेबंद नाबाद ९० धावांच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील आपला पहिला विजय नोंदवून गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा ७ विकेट्सने धुव्वा उडवला. मुंबईने दिलेल्या १४३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादने १७.३ षटकांत ३ फलंदाजांच्या मोबदल्यात १४५ धावा फटकावल्या.राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना अडखळत्या सुरुवातीनंतर मुंबईकरांनी समाधानकारक मजल मारली. हैदराबादचीही सुरुवात अडखळती झाली. पहिल्याच षटकात टिम साऊदीने धोकादायक शिखर धवनला माघारी धाडत यजमानांना धक्का दिला. यानंतर वॉर्नर व मोइसेस हेन्रीकेस यांनी ६६ धावांची भागीदारी करून संघाला सावरले. दरम्यान, सहाव्या षटकात हरभजनसिंगच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक पार्थिव पटेलने वॉर्नरला यष्टिचीत करण्याची संधी सोडली. पुढे याचा मोठा फटका मुंबईला बसला.साऊदीने पुन्हा एकदा मुंबईला यश मिळवून देत हेन्रिक्स (२०) बाद केले. यानंतर इआॅन मॉर्गनही (११) फारशी चमक न दाखवता साउदीचाच शिकार ठरला. या वेळी मुंबईकर पुनरागमन करणार, असे दिसत होते. मात्र, वॉर्नरने अखेरपर्यंत नाबाद राहून हैदराबादच्या पहिल्या विजयावर शिक्का मारला. वॉर्नरने ५९ चेंडंूत ७ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ९० धावा कुटल्या. दीपक हुडाने त्याला अखेरपर्यंत साथ देताना ९ चेंडंूत नाबाद १७ धावा फटकावल्या. मुंबईकडून साउदीने चांगला मारा करताना यजमानांचे तिन्ही बळी मिळवले.तत्पूर्वी, अंबाती रायुडूचे (४९ चेंडंूत ५४ धावा) संयमी अर्धशतक व युवा कृणाल पांड्याची (२८ चेंडंूत नाबाद ४९ धावा) फटकेबाजी या जोरावर मुंबईने अडखळत्या सुरुवातीनंतरही हैदराबादसमोर ६ बाद १४२ अशी समाधानकारक मजल मारली. कर्णधार रोहित शर्मासह प्रमुख फलंदाज अपयशी ठरल्यानंतर रायुडू व कृणाल यांनी मुंबईला सावरण्यात मोलाचे योगदान दिले.> संक्षिप्त धावफलक :मुंबई इंडियन्स : २० षटकांत ६ बाद १४२ धावा (अंबाती रायुडू ५४, कृणाल पांड्या नाबाद ४९; बरिंदर सरन ३/२८) पराभूत वि. सनरायझर्स हैदराबाद : १७.३ षटकांत ३ बाद १४५ धावा (डेव्हीड वॉर्नर नाबाद ९०, मोझेस हेन्रिक्स २०; टिम साउदी ३/२४)