शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

मुंबई इंडियन्स पराभूत

By admin | Updated: April 17, 2016 03:37 IST

अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात अ‍ॅरॉन फिंचने शेवटपर्यंत टिकून राहत गुजरात लायन्सचा आयपीएलमध्ये सलग तिसरा विजय साकारला. फिंचच्या नाबाद अर्धशतकाच्या

- रोहित नाईक, मुंबईअखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात अ‍ॅरॉन फिंचने शेवटपर्यंत टिकून राहत गुजरात लायन्सचा आयपीएलमध्ये सलग तिसरा विजय साकारला. फिंचच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर गुजरातने गतविजेत्या मुंबई इंडियन्सला ३ गडी राखून नमवले. मुंबईचा हा दुसरा पराभव असून गुजरातने गुणतालिकेत आपले अव्वल स्थान भक्कम केले.वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईचा डाव ८ बाद १४३ असा रोखण्यात गुजरातला यश आले. धवल कुलकर्णी - प्रवीण तांबे या ‘मुंबईकरांच्या’ अचूक माऱ्यापुढे गतविजेत्यांच्या धावसंख्येला खीळ बसली. या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातचीही दमछाक झाली. अखेरच्या २ षटकांत १३ धावांची गरज असताना मिशेल मॅक्लेनघनने अप्रतिम मारा करीत जेम्स फॉल्कनर व प्रवीण कुमारला बाद केले. यामुळे मुंबईला विजयाची सुवर्णसंधी मिळाली होती. शेवटच्या षटकात ११ धावांची गरज असताना ‘मुंबईकर’ धवल कुलकर्णीने जसप्रीत बुमराहला चौकार मारून सामना गुजरातच्या बाजूने झुकवला, तर अखेरच्या चेंडूवर फिंचने विजयी चौकारासह गुजरातचा विजय साकारला. मॅक्लेनघनने (४/२१) गुजरातवर जबरदस्त दडपण टाकले. बुमराहनेही (२/३२) चांगला मारा केला. फिंचने अखेरपर्यंत नाबाद राहत ५४ चेंडूंत ७ चौकार व एका षटकारासह ६७ धावांची विजयी खेळी केली, तर कर्णधार सुरेश रैनाने २७ धावांची छोटेखानी फटकेबाजी केली. तत्पूर्वी, वानखेडेची खेळपट्टी चांगल्या प्रकारे ओळखून असलेल्या धवलने मुंबईकरांना बॅकफुटवर नेले. प्रवीण तांबेनेही त्याला साथ देत २ महत्त्वपूर्ण बळी मिळवले. मुंबईकडून पार्थिव पटेलने सर्वाधिक ३४ धावा केल्या, तर टीम साऊदी (२५) व कृणाल पंड्या (नाबाद २०) यांनी अखेरच्या काही षटकांत केलेल्या हल्ल्यामुळे मुंबईला समाधानकारक मजल मारण्यात यश आले.धावफलक :मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा झे. जकाती गो. कुलकर्णी ७, पार्थिव पटेल झे. फॉल्कनर गो. तांबे ३४, हार्दिक पंड्या झे. जकाती गो. कुलकर्णी २, जोस बटलर यष्टिचित (कार्तिक) गो. जकाती १६, किरॉन पोलार्ड झे. ब्राव्हो गो. तांबे १, अंबाती रायुडू त्रि. गो. फॉल्कनर २०, हरभजनसिंग झे. कार्तिक गो. ब्राव्हो ८, कृणाल पंड्या नाबाद २०, टीम साउदी धावबाद (कार्तिक/ब्राव्हो) २५, मिशेल मॅक्लेनघन नाबाद ०; अवांतर : १०; एकूण : २० षटकांत ८ बाद १४३; गोलंदाजी : प्रवीणकुमार ३-०-१८-०, धवल कुलकर्णी ४-१-१९-२, शादाब जकाती ३-०-१३-१, जेम्स फॉल्कनर ४-०-४०-१, प्रवीण तांबे २-०-१२-२, ड्वेन ब्राव्हो ४-०३९-१; गुजरात लायन्स : अ‍ॅरॉन फिंच नाबाद ६७, ब्रॅँडन मॅक्युलम झे. हार्दिक पंड्या गो. बुमराह ६, सुरेश रैना झे. पटेल गो. मॅक्लेनघन २७, दिनेश कार्तिक गो. हरभजनसिंग गो. कृणाल पंड्या ९, ड्वेन ब्राव्हो झे. पटेल गो. बुमराह २, आकाशदीप नाथ झे. हार्दिक पंड्या गो. मॅक्लेनघन १२, जेम्स फॉल्कनर झे. पटेल गो. मॅक्लेनघन ७, प्रवीण कुमार झे. पटेल गो. मॅक्लेनघन ०, धवल कुलकर्णी नाबाद ६; अवांतर : ११; एकूण : २० षटकांत ७ बाद १४७; गोलंदाजी : टीम साउदी ४-०-३१-०, जसप्रीत बुमराह ४-०-३२-२, मिशेल मॅक्लेनघन ४-०-२१-४, कृणाल पंड्या ४-०-२०-१, हार्दिक पंड्या २-०-१६-०, हरभजनसिंग २-०-२०-०.