शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: पैसा आणि वेळ व्यर्थ गेला- दूती चंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 06:42 IST

अशावेळी नव्याने तयारी करण्यासाठी पुन्हा मदतीचा हात पुढे येईल की नाही, याबाबत शंका वाटत आहे.’ भारताची वेगवान धावपटू असलेली आशियाई क्रीडा स्पर्धेची रौप्य विजेती दूतीचंद हिने गुरुवारी ही व्यथा मांडली.

नवी दिल्ली : ‘कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑलिम्पिकच्या तयारीवर जो खर्च झाला तो पैसा आणि वेळ व्यर्थ गेला. ऑलिम्पिकचे आयोजनदेखील अधांतरी आहे. अशावेळी नव्याने तयारी करण्यासाठी पुन्हा मदतीचा हात पुढे येईल की नाही, याबाबत शंका वाटत आहे.’ भारताची वेगवान धावपटू असलेली आशियाई क्रीडा स्पर्धेची रौप्य विजेती दूतीचंद हिने गुरुवारी ही व्यथा मांडली.कोरोनामुळे जगभरात लॉकडाऊन असल्याने क्रीडाविश्व ठप्प झाले आहे. ओडिशाच्या या धावपटूने आॅलिम्पिकच्या तयारीसाठी विदेशात प्रशिक्षण तसेच कोचेसच्या मार्गदर्शनावर आतापर्यंत ३० लाख रुपये खर्च केले. भुवनेश्वर येथून वृत्तसंस्थेशी बोलताना दूती म्हणाली, ‘गेल्या आॅक्टोबरपासून कोच, सहायक कोच, ट्रेनर, रनिंग पार्टनर अशा दहा जणांच्या चमूसोबत माझा सराव सुरू झाला होता. यावर महिन्याकाठी साडेचार लाख खर्च यायचा. आतापर्यंत ३० लाखाचा खर्च होऊन गेला.’जकार्ता येथे २०१८ ला झालेल्या आशियाई स्पर्धेत शंभर मीटर शर्यतीची रौप्य विजेती दूती क्रीडा मंत्रालयाच्या टार्गेट आॅलिम्पिक योजनेत सहभागी नाही. ओडिशा सरकार आणि केआयआयटीने तिला दत्तक घेतले आहे. टोकियो आॅलिम्पिक २०२० साठी हे प्रायोजनपद होते. आॅलिम्पिक वर्षभरासाठी लांबणीवर पडल्यामुळे सरावाची चिंता दूतीला सारखी बोचत आहे.ओडिशा खनिकर्म विभागाची कर्मचारी असलेली दूती पुढे म्हणाली, ‘कोरोनामुळे जगातील अर्थव्यवस्थेला फटका बसला. सध्या मूलभूत गरजांवर लक्ष्य केंद्रित असल्याने मला प्रायोजक मिळेलच असे नाही. जर्मनीत तीन महिने सरावासाठी विमानाचे तिकीट बुक केले होते. त्याचे पैसे बुडीत गेले. याशिवाय २० लाख रुपये अग्रिम भरले होते, तेदेखील मिळण्याची शक्यता कमी आहे. सराव थांबल्यामुळे माझा धावण्याचा वेग कमी झाला. हा वेग कायम करण्यासाठी किमान सहा महिने लागणार आहेत.’आॅक्टोबरमध्ये सरावाला हळूहळू सुरुवात होते तेव्हा मार्चमध्ये धावण्यास वेग येतो. जर्मनीत सरावाद्वारे मी वेगवान धावून वेळेचे नियोजन करणार होते. पण आशेवर पाणी फेरले आहे.आॅलिम्पिकचे आयोजन होईलच याचीदेखील शाश्वती नाही. कोरोनाचा प्रकोप वाढतो आहे शिवाय लस आलेली नाही. भारतात अ‍ॅथ्लेटिक्स सरावाच्या अ‍ॅडव्हान्स सुविधा नाहीत. आॅलिम्पिक पात्रतेसाठी विदेशात सराव फारच आवश्यक असल्याचे दूतीचे मत आहे. भारताच्या जितक्या खेळाडूंनी आॅलिम्पिकची पात्रता गाठली ती विदेशातील तयारीच्या बळावरच, असेही दूतीने सांगितले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या