मोहोळ प्रिमियर लीग व्हॉलीबॉल स्पर्धेस प्रारंभ
By admin | Updated: December 2, 2014 00:36 IST
मोहोळ: आदर्श चौकातील मराठी मुलांच्या शाळेत यंग चॅलेंर्जस अकॅडमीच्या वतीने आयोजित मोहोळ प्रिमियर लीग व्हॉलीबॉल स्पर्धेस प्रारंभ झाला असून, याचे उद्घाटन माजी आमदार राजन पाटील यांच्या हस्ते झाल़े यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, उपाध्यक्ष हेमंत गरड, शहाजहान शेख, र्शीकांत गायकवाड, रणजित फाटे, विक्रांत दळवी, शकील शेख, कामिना चोरमोले, कल्पना खंबारे, दाऊद पठाण, दत्तात्रय पुराणिक, दिनेश धोत्रे, कुंदन धोत्रे, संजय मोरे, मुस्ताक शेख आदी उपस्थित होत़े
मोहोळ प्रिमियर लीग व्हॉलीबॉल स्पर्धेस प्रारंभ
मोहोळ: आदर्श चौकातील मराठी मुलांच्या शाळेत यंग चॅलेंर्जस अकॅडमीच्या वतीने आयोजित मोहोळ प्रिमियर लीग व्हॉलीबॉल स्पर्धेस प्रारंभ झाला असून, याचे उद्घाटन माजी आमदार राजन पाटील यांच्या हस्ते झाल़े यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, उपाध्यक्ष हेमंत गरड, शहाजहान शेख, र्शीकांत गायकवाड, रणजित फाटे, विक्रांत दळवी, शकील शेख, कामिना चोरमोले, कल्पना खंबारे, दाऊद पठाण, दत्तात्रय पुराणिक, दिनेश धोत्रे, कुंदन धोत्रे, संजय मोरे, मुस्ताक शेख आदी उपस्थित होत़ेसाखळी पद्धतीने चालणार्या तीनदिवसीय या स्पर्धेच्या प्रथम क्रमांकासाठी 7 हजार रुपये, द्वितीय 5 हजार तर तृतीय क्रमांकासाठी तीन हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आह़ेचौथ्या व पाचव्या क्रमांकासाठी 2 हजार रुपये, तर सहाव्या क्रमांकासाठी 1 हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आह़े तसेच सामनावीर, उत्कृष्ट कर्णधार, उत्कृष्ट नेटमन, उत्कृष्ट शूटर, शिस्तबद्ध संघ अशी विविध बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत़यासाठी यंग चॅलेंर्जसचे अध्यक्ष रूपेश धोत्रे, योगेश भोसले, अमोल जोशी, नीलेश बरे, सुभाष कुंभार, किरण वाघमोडे, माऊली गायकवाड, तुळजाराम धोत्रे, भैय्या कोरे आदी पर्शिम घेत आहेत़