शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
5
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
6
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
7
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
8
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
9
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
10
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
11
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
12
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
13
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
14
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
15
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
16
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
17
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
18
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले
19
मुंबईची राज्यात तिसऱ्या स्थानी झेप, गतवर्षीच्या तुलनेत एक टक्का वाढ
20
भाजप जिल्ह्याध्यक्षांची संभाव्य नावे प्रदेशाकडे ; नावांबाबत उत्सुकता; आठवडाभरात निर्णय

मिसबाह बनला गदाधारी

By admin | Updated: September 21, 2016 20:41 IST

पाकिस्तानी क्रिकेट संघाला त्यांचा कर्णधार मिसबाह उल हक याला आयसीसीने कसोटी चॅम्पियनशिप गदा सोपवली.

ऑनलाइन लोकमतलाहोर, दि. २१ : आयसीसीतर्फे २00३ पासून सुरुवात झालेल्या कसोटी संघ रँकिंगनंतर प्रथमच अव्वल स्थानी पोहोचणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेट संघाला त्यांचा कर्णधार मिसबाह उल हक याला आयसीसीने कसोटी चॅम्पियनशिप गदा सोपवली.आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्डसन यांनी येथे गद्दाफी स्टेडियमवर मिसबाहला गदा सोपवली तेव्हा पाकिस्तानचा कसोटी कर्णधार मिसबाहने गदा सोपवण्याचा सोहळा मैदानावर आयोजित करणे चांगले असल्याचे म्हटले.मिसबाहने म्हटले, आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप गदा स्वीकरण्यासाठी अशा मैदानापेक्षा चांगले स्थळ असूच शकत नाही. जेथे आम्ही सात वर्षांपूर्वी अखेरची कसोटी खेळली होती.

खेळाडू आणि चाहत्यांसाठी विडंबना म्हणजे नंबर वनचा प्रवास पाकिस्तानच्या बाहेर झाला. खेळाडूंना चाहत्यांच्या प्रोत्साहनाची उणीव भासली तर काही प्रेक्षक चांगल्या संघाला खेळताना आणि वैयक्तिक कामगिरी आपल्यासमोर पाहण्यापासून मुकले; परंतु हे चित्र बदलेल आणि लवकरच पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू होईल याचा विश्वास आहे.

आॅस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि भारतानंतर पाकिस्तान पाचवा संघ आहे जो की, आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये अव्वल स्थानी पोहोचण्यात यशस्वी ठरला आहे. मिसबाह हा नववा कर्णधार आहे ज्याने की कसोटी चॅम्पियनशिप गदा उंचावण्याचे भाग्य मिळाले आहे. त्याआधी स्टीव्ह वॉ, रिकी पाँटिंग, मायकल क्लार्क, स्टीव्ह स्मिथ (सर्वच आॅस्ट्रेलिया), महेंद्रसिंह धोनी (भारत), अँड्र्यू स्ट्रॉस (इंग्लंड), ग्रॅमी स्मिथ आणि हाशीम अमला (दोन्ही दक्षिण आफ्रिका) यांना सन्मान मिळाला आहे.

रिचर्डसनने पाकिस्तानी संघाचे अभिनंदन करताना म्हटले की, मार्च २00९ पासून स्वदेशात मालिका न खेळतानाही पाकिस्तानने नंबर वन कसोटी रँकिंग मिळवणे ही खूप प्रभावी बाब आहे. मार्च २00९ मध्ये येथे श्रीलंकन क्रिकेट संघाच्या बसवर दहशतवादी हल्ल्यानंतर कोणत्याही कसोटी संघाने पाकिस्तानचा दौरा केलेला नाही.

जागतिक क्रमवारीतील दुसऱ्या स्थानावरील संघ भारत उद्यापासून तीन कसोटींच्या मालिकेसाठी न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर दोन हात करीत आहे. भारताने ही मालिका जिंकली, तर ते नंबर वनवर कब्जा मिळवतील. पाकिस्तानलादेखील वेस्ट इंडीजविरुद्ध १३ आॅक्टोबरपासून ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे