शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
2
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
3
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
4
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
5
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
6
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
7
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
8
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
9
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
10
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
11
एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर... पण काही केल्या झोपच येईना; 'या' ६ टिप्स गाढ झोपेमागचं रहस्य
12
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
13
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
14
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
15
एका शेअरने बदललं गुंतवणूकदारांचे नशीब! १ लाखाची गुंतवणूक ५ वर्षांत झाली ३४ लाखांहून अधिक
16
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!
17
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
18
अवघे पाऊणशे वयमान! सत्तरीत जग फिरण्याचं स्वप्न; ३५ देशांची सोलो ट्रिप, कोण आहे 'ट्रॅव्हल अम्मा'?
19
पितृपक्ष २०२५: कधी आहे सर्वपित्री अमावास्या? खंडग्रास सूर्यग्रहण लागणार; पाहा, काही मान्यता
20
'...तरच गाझा युद्ध थांबेल'; शांतता चर्चेत नवा ट्विस्ट, इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांचे मोठे विधान!

मिर्झा - हिंगीस उपांत्य फेरीत

By admin | Updated: August 23, 2015 02:10 IST

अग्रमानांकित सानिया मिर्झा - मार्टिना हिंगीस या अनुभवी जोडीने आपल्या लौकिकानुसार कामगिरी करताना सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत उपांत्य फेरी गाठली.

सिनसिनाटी : अग्रमानांकित सानिया मिर्झा - मार्टिना हिंगीस या अनुभवी जोडीने आपल्या लौकिकानुसार कामगिरी करताना सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत उपांत्य फेरी गाठली. त्याचवेळी पुरुषांच्या दुहेरीमध्ये लिएंडर पेस आणि रोहन बोपण्णा यांचे आव्हान मात्र संपुष्टात आले.एकतर्फी झालेल्या सामन्यात वर्चस्व राखलेल्या सानिया - हिंगीस जोडीने अमेरिकेच्या वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळवलेल्या क्रिस्टिना मशाले - कोको वांडेवेगे या जोडीचा ६-४, ६-१ असा धुव्वा उडवला. पहिल्या सेटमध्ये काहीसा प्रतिकार केलेल्या क्रिस्टिना - कोको जोडीचा दुसऱ्या सेटमध्ये मिर्झा - हिंगीस यांच्या आक्रमकतेपुढे निभाव लागला नाही. उपांत्य सामन्यात या अव्वल जोडीचा सामना द्वितीय मानांकित हाओ चिंग चान - युंग जान चान या तैपेईच्या जोडीविरुद्ध होईल.त्याचवेळी पुरुष दुहेरी गटात भारताच्या पेस व बोपण्णा यांना आपापल्या जोडीदारांसह उपांत्यपूर्व फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. इवान डोडिज - मार्सेलो मेलो या द्वितीय मानांकित जोडीने तीन सेटपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत झुंजार खेळ करताना रोहन बोपण्णा - फ्लोरिन मर्जिया या पाचव्या मानांकित जोडीचा ६-१, १-६, १४-१२ असा पाडाव केला, तर यानंतरच्या अटीतटीच्या झालेल्या उपांत्य सामन्यात पेस - स्टानिलास वावरिंका या अनुभवी जोडीला फेलिसियानो लोपेझ - मॅक्स मिर्नयी यांना ३-६, ६-२, १४-१२ असे नमविले.(वृत्तसंस्था)