शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

दिग्गज मुष्टीयोद्धा माइक टायसन २९ सप्टेंबरला येणार मुंबईत; भारतीय चाहत्यांचा उत्साह शिगेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 01:02 IST

जागतिक क्रीडा विश्वातील दिग्गज व्यक्तिमत्त्व असलेला माजी हेविवेट चॅम्पियन माइक टायसन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार असून मिक्स मार्शल आटर््स (एमएमए) कुमिते - १ या लीगचे अनावरण टायसनच्या हस्ते २९ सप्टेंबर होईल

मुंबई : जागतिक क्रीडा विश्वातील दिग्गज व्यक्तिमत्त्व असलेला माजी हेविवेट चॅम्पियन माइक टायसन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार असून मिक्स मार्शल आटर््स (एमएमए) कुमिते - १ या लीगचे अनावरण टायसनच्या हस्ते २९ सप्टेंबर होईल. एमएमए कुमिते १ लीगचे मुख्य आयोजक मोहम्मदअली बुधवानी यांनी याविषयी ‘लोकमत’ला माहिती दिली.आॅल इंडिया मिक्स मार्शल आटर््स फेडरेशन (एआयएमएमएएफ) आणि वर्ल्ड किकबॉक्सिंग नेटवर्क (डब्ल्यूकेएन) यांच्या मान्यतेने होत असलेल्या या लीगसाठी दिग्गज टायसन मुख्य चेहरा असेल. यानिमित्ताने पहिल्यांदाच भारत दौºयावर येत असलेल्या टायसन यांना प्रत्यक्षात पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींची उत्सुकता उंचावली आहे. या लीगची पहिली ‘नाइट फाइट’ २९ स्पटेंबरला वरळी येथील एनएससीआय डोम बंदिस्त स्टेडियममध्ये होईल. यावेळी भारत वि. यूएई या लढतीने या लीगला सुरुवात होईल. विशेष म्हणजे सांघिक स्तरावर होणारी ही लीग एमएमए खेळाच्या इतिहासातील पहिली सांघिक स्पर्धा ठरेल.एकूण ८ देशांचा सहभाग असलेल्या या लीगमध्य यजामन भारतासह यूएई, रशिया, चीन, अमेरिका, यूके, पाकिस्तान व बहारीन या देशांचा सहभाग असेल. प्रत्येक संघात ९ खेळाडूंचा समावेश असून एका महिला खेळाडूचा समावेश अनिवार्य असेल. तसेच, एमएमए खेळाची गुणपद्धत सर्व प्रेक्षकांना कळण्यासाठी या लीगच्या आयोजकांनी विशेष प्रणाली तयार केली असून याद्वारे लाइव्ह गुणपद्धत दाखविण्यात येईल. एमएमए खेळाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशी लाइव्ह गुणपद्धतीचा अवलंब करण्यात येणार असल्याची माहितीही आयोजक बुधवानी यांनी दिली.- ८ संघांसाठी लिलाव प्रक्रीयेतून खेळाडूंची निवड होणार असून या लिलावाचे आयोजन भारत, दुबई, लास वेगास व लंडन येथे होईल.- भारतीय फायटर्सना या लीगमध्ये संधी मिळण्यासाठी के१एल स्थानिक पातळीवर ‘टॅलेंट हंट’ राबविणार असून यातून गुणवान खेळाडूंची निवड होईल, अशी माहिती आयोजक बुधवानी यांनी दिली. लीगच्या पहिल्या हंगामासाठी मुंबई, दिल्ली. कोलकाता आणि बंगळुरु येथे टॅलेंट हंटचे आयोजन होईल.

टॅग्स :boxingबॉक्सिंग