शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या प्राथमिक चौकशी अहवालात काय?; कारण अद्यापही गुलदस्त्यात
2
रस्ते बंद केले, नेत्यांची धरपकड केली, कार्यकर्त्यांना डांबले तरीही ‘मराठी’ ताकद रस्त्यावर दिसली
3
महामुंबई तापाने फणफणली! खोकून खोकून घसा लाल, ताप-सर्दीची लागण झपाट्याने वाढतेय
4
विधानमंडळ सचिव भोळे यांचे पंख छाटले; अन्य ३ सचिवांना सभापतींनी दिल्या जबाबदाऱ्या
5
बेकायदा लाऊडस्पीकर रोखल्याचा दावा; सरकारवर अवमानाची कारवाई करण्यास उच्च न्यायालयाचा नकार
6
विमानांचे वाढते तिकीट दर नियंत्रित करणार; डीजीसीएनं लोकलेखा समितीच्या बैठकीत दिली हमी
7
लाखभर शाळांचे शाळाबाह्य मूल्यांकन ३१ जुलैपर्यंत; ‘पीएम श्री’ शाळांचाही समावेश
8
संविधान हे देशातील रक्तविरहित क्रांतीचे शस्त्र; सरन्यायाधीश गवई यांचा महाराष्ट्र विधिमंडळातर्फे सत्कार
9
‘एक्स’वर ७० रुपयांत जेवण, स्टेशनवर ‘ढूंढते रह जाओंगे’; रेल्वेची करामत, प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर 
10
टेनिस बॉल क्रिकेटमुळे होणार दादोजी कोंडदेव स्टेडियम ‘बोल्ड’; सीझन बॉल स्पर्धेलाच मैदान देणार
11
कुजबुज! रामदास आठवलेंच्या भूमिकेत एकनाथ शिंदे, गवईंच्या सत्कार सोहळ्यात सगळे हसले
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

मेक्सिकोला अश्रू अनावर, सौदीला नमवूनही विश्वचषक मोहीम समाप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 05:28 IST

याच गटातील अन्य सामन्यात अर्जेंटिनाने पोलंडवर २-० असा विजय मिळवल्याने गोल अंतर फरकाच्या जोरावर पोलंडने पराभवानंतरही बाद फेरी गाठली.

लुसैल : हेन्री मार्टिन आणि लुई शावेज यांनी केलेल्या गोलच्या जोरावर मेक्सिकोने आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात सौदी अरबला नमवले. मात्र, यानंतरही विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश करण्यात यश न आल्याने मेक्सिकोच्या चाहत्यांना अश्रू अनावर झाले. बुधवारी मध्यरात्री झालेल्या सामन्यात मेक्सिकोने सौदी अरबला २-१ असे नमवले. 

याच गटातील अन्य सामन्यात अर्जेंटिनाने पोलंडवर २-० असा विजय मिळवल्याने गोल अंतर फरकाच्या जोरावर पोलंडने पराभवानंतरही बाद फेरी गाठली. १९७८ नंतर पहिल्यांदाच मेक्सिकोला विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश करता आला नाही. गेल्या सातही विश्वचषक स्पर्धांमध्ये मेक्सिकोने बाद फेरी गाठली होती. मेक्सिकोकडून मार्टिनने ४८व्या मिनिटाला, तर शावेजने ५२व्या मिनिटाला गोल करीत संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी मेक्सिकोने अखेरपर्यंत कायमही राखली. मात्र, अतिरिक्त वेळेत सालेम अल्दावसारीने एक गोल करीत सौदी अरबची पिछाडी १-२ अशी कमी केली. 

    १९७८ नंतर पहिल्यांदाच विश्वचषक स्पर्धेत साखळी फेरीतच मेक्सिकोचे आव्हान संपुष्टात.    सहा वेळा विश्वचषक स्पर्धेत सहभागी झालेल्या सौदी अरब संघाचे आव्हान पाचव्यांदा साखळी फेरीत संपुष्टात.     मेक्सिकोने सौदी अरब संघाविरुद्धची अपराजित मालिका कायम राखली.

टॅग्स :FootballफुटबॉलMexicoमेक्सिको